PM Svanidhi Scheme : सरकारद्वारे अनेक लोकोपयोगी योजना वेळोवेळी सादर केल्या जातात, या योजनांचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे ज्यांना खरोखरच गरज आहे. दरम्यान अशातच सरकारकडून आणखी एक योजना सुरु करण्यात आली. जी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. सरकारद्वारे कोणती योजना सुरु करण्यात आली आहे? आणि ही योजना कशी काम करते?, चला सविस्तर जाणून घेऊया…
आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने पीएम स्वानिधी योजना सुरू केली आहे. ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना कोणत्याही तारण न घेता क्रेडिट सुविधा दिली जाते. ही योजना जून 2020 मध्ये कोरोना महामारीच्या वेळी सुरू करण्यात आली होती.
50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा !
सरकारच्या या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतचे कर्ज एका वर्षाच्या कालावधीसाठी कोणत्याही हमीशिवाय मिळतेहे. या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, 20,000 रुपयांच्या कर्जाचा दुसरा हप्ता आणि 50,000 रुपयांच्या कर्जाचा तिसरा हप्ता देण्याची सुविधा दिली जाईल. यासोबतच वर्षाला ७ टक्के दराने व्याज अनुदान दिले जाणार आहे. ही रक्कम 400 रुपयांपर्यंत असेल. त्याच वेळी, ग्राहकांना दरवर्षी 1200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तुमच्या माहितीसाठी प्रति डिजीटल व्यवहार करण्यासाठी 1 रुपये ते 100 रुपये प्रति महिना कॅशबॅक मिळतो. याचा अर्थ तुम्हाला एका वर्षात 1200 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
राज्यांची जबाबदारी
राज्ये/यूएलबी पात्र रस्त्यावरील विक्रेत्यांची ओळख आणि योजनेअंतर्गत नवीन अर्ज गोळा करण्यासाठी जबाबदार आहेत. तथापि, लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मंत्रालय अनेक उपक्रम घेत आहे ज्यात राज्ये/केंद्रशासित प्रदेश/यूएलबी/कर्ज देणार्या संस्थांसोबत नियमित आढावा बैठका घेणे, रेडिओ जिंगल्स, दूरचित्रवाणी जाहिराती आणि वृत्तपत्रे यांचा समावेश आहे. यामध्ये वेळोवेळी जागरुकता मोहीम चालवणे समाविष्ट आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि फायद्यांचा प्रसार करण्यासाठी विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना स्थानिक भाषांमधील माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) साहित्य देखील नियमितपणे प्रदान करण्यात आले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी https://pmsvanidhi.mohua.gov.in या लिंकला भेट देऊ शकता.