आर्थिक

PMJDY scheme : सरकारच्या ‘या’ विशेष योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे 2 लाख रुपयांचा अपघात विमा, वाचा सविस्तर…

PMJDY scheme : केंद्र सरकारच्या PM जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती 50 कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे.

सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. याशिवाय सरकारी योजनेतील पैसे आधी या खात्यात पाठवले जातात. चला तर सरकारची ही योजना कशी काम करते? आणि काय फायदे देते? सविस्तर जाणून घेऊया.

सरकारने पीएम जन धन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू झाली होती आणि या योजनेला ऑगस्ट महिन्यापासून 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. बँकेतील जनधन खातेदारांची संख्या 50 कोटींच्या पुढे गेली आहे.

रिपोर्टनुसार, जनधन खाती उघडण्यासाठी सर्वात जास्त महिला पुढे आल्या आहेत. 50 कोटी लोकांपैकी 56 टक्के खाती महिलांची आहेत. तर 67 टक्के खाती ग्रामीण आणि शहरी लोकांची आहेत. या योजनेअंतर्गत ३४ कोटी लोकांना रुपे कार्ड जारी करण्यात आले आहेत.

पंतप्रधान जन धन योजनेचे फायदे :-

सरकारची ही योजना अतिशय खास आहे. या योजनेअंतर्गत प्रौढांना बँक खाती उघडण्याची सुविधा दिली जाते. यासोबतच या खात्यात किमान शिल्लक राखण्याची गरज नाही. जन धन खातेधारकांना 2 लाख रुपयांचा मोफत अपघात विमा देखील मिळतो.

जन धन योजनेअंतर्गत खातेदारांना ३० हजार रुपयांचा जीवन विमा मिळतो. यासोबतच 10,000 रुपयांपर्यंतचे डेबिट कार्ड आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. या योजनेत पैसे जमा केल्यावर व्याज मिळते. ही रक्कम प्रथम सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या जन धन खात्यात हस्तांतरित केली जाते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts