PMSBY : गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेकदा विविध योजना आणते. यातील अनेक योजना लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना आहेत. यापैकी एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). ही एक अपघात संरक्षण विमा योजना आहे. ज्यामध्ये तुम्हाला फक्त 20 रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीसह 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते.
2015 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती. हा अपघाती विमा 20 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर उपलब्ध आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लोकांना कठीण परिस्थितीत मदत करणे हा आहे.
देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवते. यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. सरकारने 2015 मध्ये ही विमा योजना सुरू केली. या विम्याची खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला हा विमा फक्त वार्षिक 20 रुपयांनमध्ये उपलब्ध आहे. कमी उत्पन्न गटाला विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारने PMSBY विमा योजना सुरू केले होती. या योजनेचा उद्देश लोकांना कठीण काळात मदत करणे हा आहे.
PMSBY ही एक सरकारी विमा योजना असून, 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती या सरकारी विमा योजनेचा लाभ घेऊ शकते, या पॉलिसीचा प्रीमियम थेट बँक खात्यातून कापला जातो. पॉलिसी खरेदी करताना PMSBY बँक खात्याशी जोडलेले जाते.
पीएमएसबीवाय पॉलिसीनुसार, विमा खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा तो अपंग झाल्यास, त्याच्या अवलंबितांना 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.
त्याचप्रमाणे, जर विमा खरेदी करणारा ग्राहक अपंग झाला असेल तर अशा परिस्थितीत 1 लाख रुपये प्राप्त होतात. 1 जून 2022 पूर्वी या प्लॅनमध्ये प्रीमियम फक्त 12 रुपये होता. नंतर प्रीमियमची रक्कम वाढवून ती 20 रुपये करण्यात आली.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. सरकारी आकडेवारीनुसार, 26 एप्रिल 2023 पर्यंत या योजनेद्वारे 2 हजार 302.26 कोटी दाव्यांची भरपाई करण्यात आली आहे. या योजनेत 34 कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.