Interest Rate Hike : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. दोन्ही बँकांनी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 bps ने वाढ केली आहे. ज्यामुळे आता या बँकांचे कर्ज महाग झाले आहेत. या वाढीमुळे कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज यांच्यावर परिणाम होणार आहे. बँकांच्या वेबसाइटनुसार, हे वाढलेले व्याजदर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) हा किमान कर्जदर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँकेने सर्व मुदतीसाठी MCLR दर 5 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवला आहे. ICICI बँकेच्या वेबसाइटनुसार, एका रात्रीसाठी आणि एका महिन्यासाठी MCLR दर 8.40 टक्क्यांवरून 8.45 टक्के झाला आहे. ICICI बँकेत, तीन महिन्यांचा MCLR दर 8.50 टक्के आणि सहा महिन्यांचा MCLR दर 8.85 टक्के झाला आहे. बँकेने एका वर्षासाठी MCLR 8.90 टक्क्यांवरून 8.95 टक्के केला आहे.
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) सप्टेंबर महिन्यात MCLR दर 5 बेस पॉईंटने वाढवले आहेत. PNB बँकेच्या वेबसाइटनुसार, आता रात्रीचा दर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के झाला आहे आणि एक महिन्याचा MCLR दर 8.20 टक्क्यांवरून 8.25 टक्के झाला आहे. PNB मध्ये तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR 8.35 टक्के आणि 8.55 टक्के आहे. एक वर्षाचा MCLR आता 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 5 bps च्या वाढीनंतर 8.95 टक्क्यांवर आहे.
बँक ऑफ इंडिया
दरम्यान, बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या MCLR रेट अपडेट करताना त्यात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, रात्रीचा MCLR दर 7.95 टक्के आहे, एका महिन्याचा MCLR दर 8.15 टक्के आहे. बँक ऑफ इंडियामध्ये तीन महिने, सहा महिन्यांचा MCLR 8.30 टक्के आणि 8.50 टक्के आहे. एका वर्षासाठी MCLR आता 8.70 टक्के आणि तीन वर्षांसाठी 8.90 टक्के आहे.