Punjab National Bank : देशातील सरकारी बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 31 ऑगस्टनंतर तुम्हाला पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत. होय, पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना नोटीस जारी करून याबद्दल माहिती दिली आहे.
पंजाब नॅशनल बँकेत देशभरातील करोडो ग्राहकांची खाती आहेत. बँकेने सांगितले आहे की, ज्या ग्राहकांनी आतापर्यंत केवायसी तपशील अपडेट केले नाहीत. या सर्वांना बँकेच्या वतीने नोटीस पाठविण्यात येत आहे.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, यासाठी अंतिम मुदत देखील घोषित करण्यात आली आहे. तुम्हाला हे काम 31 ऑगस्ट 2023 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. जे ग्राहक हे काम देय तारखेपर्यंत पूर्ण करणार नाहीत त्यांना बँकिंग व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
2 ऑगस्ट 2023 रोजी माहिती देताना बँकेने सांगतिले की, ज्या ग्राहकांनी अजूनही KYC अपडेट केले नाही अशा सर्व ग्राहकांना बँकेकडून नोंदणीकृत पत्त्यावर नोटीस पाठवली जात आहे. यासोबतच त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही संदेश पाठवला जात आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना RBI च्या नियमांनुसार 31 ऑगस्ट 2023 पूर्वी त्यांची KYC माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ३१ जुलैपर्यंत तुमचा केवायसी अपडेट केला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेऊ शकता. याशिवाय बँकेच्या वेबसाइटवरूनही केवायसी अपडेट करता येईल.
आवश्यक कागदपत्रे
केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक असेल. याशिवाय, या तपशिलांमध्ये कोणताही बदल न झाल्यास, तुम्हाला बँकेत स्वयं-घोषणापत्र द्यावे लागेल.
तुमची केवायसी स्थिती तपासा
-यासाठी तुम्हाला ऑनलाइन PNB वेबसाइटवर क्रेडेंशियलसह लॉग इन करावे लागेल.
-वैयक्तिक सेटिंग्जवर जा आणि केवायसी स्टेटसवर क्लिक करा.
-तुम्हाला तुमचे केवायसी अपडेट करायचे असल्यास ते स्क्रीनवर दिसेल.