PNB FD Interest Rates : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने दुसऱ्यांदा आपल्या एफडी दरात वाढ करून ग्राहकांना आणखी खुश केले आहे. बँकेने लागू केलेले हे नवीन दर 8 जानेवारीपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना आता बँकेच्या एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे, बँकेने किती कालावधीच्या एफडी दरात वाढ केली आहे, चला पाहूया…
PNB ने या महिन्यात दुसऱ्यांदा 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या FD वर व्याजदर वाढवले आहेत. यापूर्वी बँकेने १ जानेवारीपासून व्याजदरात वाढ जाहीर केली होती.
बँकेने सध्या एफडी दर 80 bps ने वाढवले आहेत. यापूर्वी 1 जानेवारी रोजी बँकेने काही मुदतीच्या दरांमध्ये 45 bps पर्यंत वाढ केली होती आणि काही दरांमध्ये कपात देखील केली होती.
त्याच वेळी, 300 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 6.25 टक्क्यांवरून 7.05 टक्के करण्यात आला आहे. PNB 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या सामान्य लोकांच्या ठेवींवर 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते.
बँकेचे नवीन व्याजदर
PNB 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंत 3.50% व्याज देत आहे, त्यानंतर 15 ते 29 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज, 30 ते 45 दिवसांच्या FD वर 3.50% व्याज, 46 ते 60 दिवसांवर 4.50% व्याज. 61 ते 90 दिवस दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के, 91 ते 179 दिवसांसाठी 4.50 टक्के आणि 180 ते 270 दिवसांसाठी 6 टक्के व्याज देण्यात येत आहे.
271 दिवस ते 299 दिवस 6.25% व्याज 300 दिवस ते 7.05% व्याज, 400 दिवस 7.25%, 401 दिवस ते 2 वर्षे 6.08% व्याज 2 वर्षे ते 3 वर्षे 7%, 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांसाठी 6.50 टक्के व्याज उपलब्ध आहे. 5 वर्षांपेक्षा कमी, 5 वर्षांपेक्षा जास्त 6.50 टक्के आणि 10 वर्षांसाठी 6.50 टक्के. असे व्याजदर लागू आहेत.
जेष्ठ नागरिकांना व्याजदर
नवीन दरांच्या अंमलबजावणीनंतर, PNB 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 4 टक्के ते 7.75 टक्के व्याज देत आहे. तर अति ज्येष्ठांना ४.३ टक्के ते ८.०५ टक्के व्याज देत आहे.