आर्थिक

Poonawala Finance Personal Loan: पूनावाला फायनान्सकडून मिळवा लाखोत पर्सनल लोन! वाचा ऑनलाइन अर्ज पद्धत आणि पात्रता, कागदपत्रे

Poonawala Finance Personal Loan:- प्रत्येक व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असताना या माध्यमातून जो काही पैसा मिळतो त्याची बचत करतात. बचत ही भविष्यकालीन आर्थिक गरजांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असते. परंतु बऱ्याचदा काही आपत्कालीन आर्थिक गरज उद्भवते.

जसे की आपल्याला एखाद्या वेळी हॉस्पिटलचा खर्च करावा लागू शकतो किंवा घरात लग्नकार्य इत्यादी कार्यक्रमाप्रसंगी देखील जास्त पैसा लागतो. त्यावेळी आपल्याकडे पुरेसा पैसा नसेल तर बऱ्याच व्यक्ती बँकांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जा करिता अर्ज करतात.

वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत जर बँकांचे नियम व व्याजदराचा विचार केला तर तो बँक निहाय वेगवेगळा आहे. यासोबतच अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसीच्या माध्यमातून देखील पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्जाची सुविधा देण्यात येते.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील ताबडतोब पैशांची गरज असेल तर तुम्ही पूनावाला फायनान्स पर्सनल लोन घेऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण पुनावाला फायनान्स पर्सनल लोनचा व्याजदर, त्याकरता लागणारी पात्रता व कुठली कागदपत्रे लागतात? त्याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.

 पुनावाला फायनान्स पर्सनल लोनसाठी आवश्यक पात्रता

1- तुम्हाला देखील पुनावाला फायनान्स वैयक्तिक कर्जा करिता अर्ज करायचा असेल तर किमान वयोमर्यादा 22 वर्ष आणि परत फेडीच्या वेळी कमाल वयोमर्यादा 64 वर्ष असणे गरजेचे आहे.

2- तसेच या पर्सनल लोन करिता जे व्यक्ती अर्ज करतील त्यांचे मासिक उत्पन्न किमान 18000 रुपये असणे गरजेचे आहे.

3- अर्जदाराचा सिबिल स्कोर हा चांगला असणे गरजेचे आहे.

4-  अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा स्वतःचा रोजगार असणे आवश्यक आहे.

 पूनावाला फायनान्स पर्सनल लोनकरिता आवश्यक कागदपत्रे

1- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

2- वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट तसेच पॅन कार्ड

3-मागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट

4- मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लिप

5- मागील एक वर्षाचा आयटीआर

 पूनावाला फायनान्स वैयक्तिक कर्जाकरिता ऑफलाइन अर्ज कसा करावा?

पूनावाला फायनान्स पर्सनल लोन करिता तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. यातील ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता….

1- तुम्हाला जर पूनावाला फायनान्स पर्सनल लोन करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या जवळच्या पूनावाला फायनान्स शाखेत जाणे गरजेचे आहे.

2- त्यानंतर तुम्हाला पूनावाला फायनान्सच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.

3- त्या ठिकाणाचे कर्मचारी तुम्हाला या पर्सनल लोन विषयी संपूर्ण माहिती देतील.

4- त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

5- कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज दिला जाईल व त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल व तुमच्या कागदपत्रांसह तो फॉर्म भरून बँकेमध्ये जमा करावे लागेल.

6- सगळं कागदपत्र किंवा पात्रतेत तुम्ही बसत असाल तर तुमचे कर्ज मंजूर केले जाते व तुमच्या कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.

 किती आहे व्याजदर?

पूनावाला फायनान्स वैयक्तिक अर्थात पर्सनल लोनचे व्याजदर हे 9.99% प्रति वर्षापासून सुरू होतात.

अधिकच्या माहिती करता तुम्ही पूनावाला फायनान्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा तुमच्या जवळच्या फायनान्सच्या शाखेशी संपर्क करू शकता.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts