Post Office : पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायदेशीर असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. तसेच त्यांना इतर योजनांपेक्षा या योजनांमध्ये चांगला परतावा देण्यात येतो.
सध्या पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना आहेत ज्या कर कपात देत असतात. जर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी आहे. तुम्ही टॅक्स भरून पैसे कमावू शकता.
या योजनांमध्ये करण्यात आलेले व्यवहार मर्यादेत राहिले तर, टीडीएस कापला जाणार नाही. हे लक्षात घ्या की TDS म्हणजे स्त्रोतावरील कपात आणि कर चुकवणे टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून थेट कर गोळा करण्यासाठी डिझाइन केलेली यंत्रणा होय.
पोस्ट ऑफिस आरडी स्कीम:
पोस्ट ऑफिस आरडी स्कीमसाठी सर्वसामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीची मर्यादा 40,000 रुपये इतकी आहे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीची मर्यादा 50,000 रुपये इतकी आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट:
या योजनेत पाच वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर वजावट उपलब्ध असून हे लक्षात घ्या की एक, दोन आणि तीन वर्षांचा कालावधी टीडीएस कराच्या अधीन आहे. तसेच हे देखील लक्षात घ्या या कालावधीत मिळालेले व्याज करपात्र आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते:
या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे 40,000 ते 50,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर कर लागू होतो. परंतु पोस्टाची ही शानदार योजना कलम 80C नुसार कर सूट अंतर्गत येत नाही.
महिला सन्मान बचत पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना:
हे लक्षात घ्या की महिला सन्मान बचत पत्र योजनेंतर्गत TDS कापण्यात येतो तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला कलम 80C अंतर्गत कर सवलत देण्यात येते.
NSC आणि PPF:
NSC योजनेअंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम करमुक्त असून मिळालेल्या व्याजावर TDS लागू होत नाही. तसेच पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना करमुक्त आहे.
किसान विकास पत्र:
हे लक्षात घ्या की जरी ही योजना कर सवलतीसाठी पात्र नसली तरी योजनेच्या मुदतपूर्तीवर काढण्यात आलेल्या रकमेवर TDS लागू होत नाही.