Post Office : जर तुम्हाला विना जोखीम लाखो रुपये कमवायचे असतील तर त्यांच्यासाठी टपाल खात्याची योजना खूप फायद्याची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट कार्यालयाच्या अनेक योजनेमध्ये गुंतवणुकीवर निश्चित हमी तर मिळतेच परंतु त्यांना जोरदार परतावा देखील मिळतो.
तुम्ही आता किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवू शकता. विशेष म्हणजे केंद्र सरकार या बचत योजनांची हमी घेत असल्याने गुंतवणूकदारांचा पैसा बुडत नाही. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूक केलेल्या रकमेवर डबल परतावा मिळवू शकता.
पोस्ट ऑफिसच्या एक सर्वोत्तम योजनापैकी एक योजना किसान विकास पत्र योजना आहे. ही एक छोटी बचत योजना असून ही शानदार योजना लहान ते मोठ्या गुंतवणूकदारांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूकदारांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर मोठा नफाही मिळत आहे. हे लक्षात ठेवा की ही पोस्ट ऑफिसची सर्वात फायदेशीर आणि परतावा देणारी योजना आहे.
ही भारतीय टपाल विभागाची एक योजना आहे ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे ठराविक वेळेनंतर डबल होतात. या योजनेतील गुंतवणुकीवर एकूण ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज उपलब्ध करून दिले जात आहे. यात गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम 9 वर्षे 7 महिन्यांत म्हणजे 115 महिन्यांत डबल होते.
खरंतर या योजनेमध्ये गुंतवणुकीवरील व्याज चक्रवाढ व्याजानुसार मोजण्यात येते. समजा तुम्ही या योजनेत 5 लाख रुपये गुंतवले तर ठराविक वेळेनंतर त्याचे 10 लाख रुपये होतात. म्हणजे डबल परतावा तुम्हाला मिळतो.
या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की या योजनेतील गुंतवणुकीची कमीत कमी मर्यादा रु 1000 आहे तर जास्तीत जास्त मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार किसान विकास पत्रामध्ये 1000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येईल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही भारतीय शेतकऱ्याला विकास पत्र योजनेत गुंतवणूक करता येते. या अंतर्गत पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे खाते चालू करू शकतात आणि पालकांपैकी कोणालाही नॉमिनी होता येते.