आर्थिक

Post Office : दरमहा मिळतील 9,250 रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक…

Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यापैकी एक मासिक उत्पन्न योजना आहे. ही एक ठेव योजना आहे ज्यामध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक करून दर महिन्याला पैसे कमवू शकता. या योजनेद्वारे तुम्हाला दरमहा उत्तम परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये रक्कम गुंतवता येते.

जमा केलेल्या या योजनेवर तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते. सध्या या योजनेचा व्याजदर ७.४ टक्के व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिस एमआयएसमध्ये, रक्कम एकावेळी 5 वर्षांसाठी जमा केली जाते, म्हणजेच तुम्ही सलग 5 वर्षे व्याज घेऊन तुमचे उत्पन्न मिळवू शकता. मुदतपूर्तीनंतर जमा केलेली रक्कम तुम्हाला परत केली जाते. पण जर तुम्हाला पाच वर्षापूर्वी पैशांची गरज असेल आणि पैसे काढायचे असतील किंवा ही मासिक कमाई योजना 5 वर्षांहून अधिक काळ चालू ठेवायची असेल, तर यासाठी काय नियम आहेत? जाणून घेऊया..

या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला मुदतपूर्ती कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढायची असेल, तर तुम्हाला ही सुविधा 1 वर्षासाठी मिळणार नाही. 1 वर्षानंतर, तुम्हाला खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळते, परंतु यात तुमचे नुकसान होते कारण तुमच्या जमा केलेल्या रकमेतून काही पैसे दंड म्हणून कापले जातात.

जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेतील 2% कपात केली जाते आणि परत केली जाते. जर तुम्हाला खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी आणि 5 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील, तर जमा केलेल्या रकमेतून 1% वजा केल्यावर ठेव रक्कम तुम्हाला परत केली जाते.

मुदत वाढवण्याचे नियम काय आहेत?

साधारणपणे, तुम्हाला FD, PPF इत्यादी सर्व योजनांमध्ये तुमचे खाते वाढवण्याची सुविधा मिळते, परंतु तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये ही सुविधा मिळत नाही. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही मॅच्युरिटीनंतर नवीन खाते उघडू शकता.

दरमहा किती कमाई करू शकता?

पोस्ट ऑफिस मंथली सेव्हिंग स्कीममध्ये तुम्ही एकाच खात्यात 9 लाख रुपये जमा केल्यास, 7.4 टक्के व्याजदराने तुम्हाला दरमहा 5,500 रुपये मासिक उत्पन्न मिळू शकते. जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केले तर तुम्ही दरमहा 9,250 रुपये कमवू शकता.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts