Post Office : पोस्ट ऑफिस देशातील करोडो लोकांसाठी सतत अनेक बचत योजना घेऊन येत असते. देशातील वेगवेगळ्या विभागांच्या गरजांनुसार पोस्ट ऑफिस या योजना तयार करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्टाच्या या योजना आकर्षक बनवण्यासाठी सरकार सतत व्याजदरात बदल करत असते.
यामध्ये उत्तम परतावा मिळतो. गुंतवलेल्या रकमेवर गुंतणूकदाराला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. त्यामुळे आजही अनेकजण डोळेझाकुन पोस्टच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सर्वात महत्त्वाचे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील देण्यात येतो. पोस्टाच्या अशा काही योजना आहेत ज्यात तुम्हाला जास्त व्याजासह बंपर परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते योजना
आता समजा तुम्ही 5 वर्षांसाठी कोणत्याही गॅरंटीड रिटर्न योजनेमध्ये पैसे गुंतवले तर पोस्ट ऑफिस आरडी स्कीम तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला एकूण 5.8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत तुम्हाला कमीत कमी 100 रुपयांची रक्कम गुंतवण्याची गरज असते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना
आता पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये तुम्हाला 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा करावी लागणार आहे. इतकेच नाही तर या शानदार योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला एकूण 6.8 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेत, तुम्हाला कमीत कमी 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. तसेच, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध होतो.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना
तर दुसरीकडे, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना असून ज्यात तुम्ही तुमचे भांडवल एकूण 1, 2, 3 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला 5.5 टक्के दराने व्याज दिले जाते. समजा तुम्हाला या योजनेत 5 वर्षांसाठी FD मिळत असेल तर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज देण्यात येते. इतकेच नाही तर, या योजनेअंतर्गत, तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध करून दिला जातो. आता तुम्ही या योजनेत कमीत कमी 1000 रुपयांसह गुंतवणूक सुरू करता येते.