आर्थिक

Post Office : पोस्ट ऑफिस दरमहा देत आहे 11,000 रुपये कमवण्याची संधी; ‘या’ योजनेत करा गुंतवणूक!

Post Office : पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक पेक्षा एक योजना आणते ज्याद्वारे तुम्ही दरमहा पैसे कमवू शकता. अशीच एक योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा कमाई करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या या आश्चर्यकारक योजनेबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण या योजनेबद्दलच जाणून घेणार आहोत. या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्हाला एकदाच पैसे गुंतवावे लागतील. त्यानंतर त्या जमा केलेल्या पैशावर तुम्हाला दर महिन्याला व्याज दिले जाते. जो दर महिन्याला तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यावर पाठवला जातो.

पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही स्कीममध्ये तुम्हाला 100 टक्के रिटर्न बघायला मिळतात. त्यामुळे इतर बँकांच्या तुलनेत लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवतात.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करू शकता. आणि तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत संयुक्त खाते उघडल्यास, तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये जमा करू शकता.

एमआयएस योजनेमध्ये तुम्ही 1 हजार ते 10 हजार रुपये, 50 ते 1 लाख, किंवा 5 लाख रुपये तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार रक्कम जमा करू शकता, तसेच एखादी व्यक्ती या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा करू शकते. आणि जर दोन लोकांनी संयुक्त खाते उघडले तर तुम्ही 15 लाख रुपये जमा करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत 2024 मध्ये 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एमआयएस स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला व्याज मिळते. म्हणूनच याला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणतात.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे आहे. जर तुम्हाला ते जास्त कालावधीसाठी जमा करायचे असेल तर 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे दुसरे MIS खाते उघडावे लागेल आणि नंतर तुमचे पैसे त्यात जमा करावे लागतील.

जर तुम्हाला 15 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दोन संयुक्त खाती उघडू शकता आणि प्रत्येकी 9 लाख रुपये जमा करू शकता, ज्यावर तुम्हाला दरमहा 11,100 रुपये उत्पन्न मिळेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts