Post Office Saving Scheme : मनी अट्रॅक्ट्स मनी म्हणजे पैसा पैशाला आकर्षित करतो असे म्हणतात. पण हे कसे शक्य आहे ? याबाबत आज आपण जाणून घेऊया. खरंतर अनेकजण आपल्याकडील पैसा आणखी वाढावा यासाठी बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात.
पोस्ट ऑफिस मधील गुंतवणुक ही पूर्णपणे सुरक्षित असते. यामुळे पोस्टाच्या बचत योजनांमध्ये अनेक जण गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही असाच काहीसा प्लॅन बनवत असाल तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका जबरदस्त योजनेची माहिती पाहणार आहोत.
आज आपण पोस्टाच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही दरमहा वीस हजार पाचशे रुपयांपर्यंत कमाई करू शकणार आहात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोणती आहे ती योजना ?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूकदार किमान एक हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात.
तसेच या योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. म्हणजेच एक हजारापेक्षा कमी आणि तीस लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 8.2% या रेटने व्याज दिले जात आहे.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो ?
या योजनेत फक्त ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. सामान्य ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करता येत नाही. ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे अशा लोकांना येथे पैसा गुंतवता येतो. मात्र ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे असे 55 ते 60 वयोगटातील नागरिक सुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
तसेच संरक्षण सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी वयाच्या ५० व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही हे खाते तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते म्हणूनही उघडू शकता, जेणेकरून दोघांनाही या योजनेचा लाभ मिळेल.
कसे मिळणार दरमहा वीस हजार पाचशे रुपये ?
या योजनेत जर गुंतवणूकदारांनी एकाच वेळी 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 8.2 टक्के या इंटरेस्ट रेट ने गुंतवणूकदारांना दरमहा वीस हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.
म्हणजेच एका वर्षात 2.46 लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे. मात्र हे पैसे पाच वर्षांपर्यंतच मिळणार आहेत. कारण की ही योजना फक्त पाच वर्षांसाठी आहे.