आर्थिक

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून करा दुप्पट कमाई; जाणून घ्या

Post Office Scheme : आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शेअर बाजारासोबतच लोक म्युच्युअल फंडातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत.

याशिवाय गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या अनेक बचत योजना आहेत. दरम्यान, आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सार्वधिक व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 114 महिन्यांतच तुमची रक्कम दुप्पट करू शकता.

पोस्ट ऑफिस आणि बँकांकडून अनेक प्रकारच्या बचत योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे तुम्ही तुमची बचत गुंतवू शकता. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका स्कीमची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये देशातील सरकारी बेनकांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.

आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट योजनेबद्दल सांगत आहोत. गुंतवणुकीसाठी हा खूप चांगला पर्याय आहे. येथे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील. आणि या योजनेतून तुम्ही चांगला परतावा देखील कमवू शकता.

तुमच्या माहितीसाठी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या 5 वर्षांच्या FD वर ग्राहकाला 6.50 टक्के व्याज मिळत आहे. तर पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्कीमवर 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

हा परतावा 5 वर्षांसाठी आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत, जमा केलेली रक्कम 9 वर्षे आणि 6 महिन्यांनंतर दुप्पट होईल. जर तुम्ही 7.50 टक्के व्याजदराने गुंतवणूक केली तर 114 महिन्यांनंतर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होईल. उदाहरणार्थ, मुदतपूर्तीनंतर 5 लाख रुपयांची गुंतवणूक 7,24,974 रुपये होईल.

यामध्ये तुम्हाला 2,24,974 रुपये व्याज म्हणून मिळेल. तुम्ही या योजनेत 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक व्यक्ती आपले खाते उघडू शकते.

यामध्ये एकाच वेळी तीन लोकांचे ग्रुप खाते उघडता येते. उदाहरणार्थ, पालकांव्यतिरिक्त इतर मुलांसाठी संयुक्त खाते उघडले जाऊ शकते. नातेवाईक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर खाते उघडू शकतात.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts