आर्थिक

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! मिळतोय बँक एफडीपेक्षा जास्त परतावा, त्वरित करा गुंतवणूक

Post Office Scheme : अनेकजण चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत आहेत. सर्वात जास्त परतावा, जोखीम मुक्त गुंतवणूक असणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास अनेकांचा कल असतो. अनेकजण पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करतात.

कारण या योजनमध्ये गुंतवणूकदारांना बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. जर तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही घरबसल्या खूप जास्त पैसे कमावू शकता.त्यामुळे या योजनांमध्ये आजच गुंतवणूक करा.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजनांचे व्याज दर:

समजा आता तुम्ही तुमच्या मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना खूप फायद्याची ठरू शकते. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्हाला सर्व आर्थिक वर्षांमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तसेच या योजनेत तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 8 टक्के व्याज देण्यात येत आहे.

आता पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल जाणून घेऊयात. या योजनेमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला ठेवीवर 7.7 टक्के दराने व्याज मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेवर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वजावट मिळत आहे. तसेच पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर तुम्हाला 8.2 टक्के दराने व्याज मिळू शकते.

तसेच जर तुम्ही आता पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल. 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूक केली तर, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सवलत मिळेल.

SBI ने FD स्कीम सुरु केली असून यात सामान्य लोकांना 5 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के दराने व्याज मिळेल. एसबीआयच्या अमृत कलश या विशेष योजनेवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.10 टक्के तर वृद्धांना 7.60 टक्के दराने व्याज मिळते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts