Post Office Scheme : आपल्याकडील पैसा वाढावा यासाठी आपण सर्वजण अहोरात्र काबाडकष्ट करत असतो. दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून पैशांची साठवणूक करतो. अनेकजण आपल्याकडील पैसा वाढावा यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करत असतात.
काहीजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस आणि बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. तसेच काहीजण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट सारख्या जोखीम पूर्ण ठिकाणी गुंतवणूक करतात.
दरम्यान जर तुम्ही ही नजीकच्या काळात पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे.
कारण की आज आपण पोस्ट ऑफिस च्या पाच वर्षांच्या एफडी योजनेबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पोस्ट ऑफिसची एफडी योजना
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना ऑफर करते. या योजनेला बँकेच्या एफडी योजनेसारखे स्वरूप मिळाले आहे. यामुळे या योजनेला पोस्टाची एफडी योजना म्हणून ओळखले जाते. पोस्टाची ही टाईम डिपॉझिट योजना एक, दोन, तीन आणि पाच वर्षांची आहे.
पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेत किमान शंभर रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये कमाल गुंतवणुकीची मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला हवी तेवढी रक्कम तो यामध्ये गुंतवू शकतो.
किती व्याज मिळते
पोस्टाच्या एक वर्षांच्या एफडी योजनेत 6.9%, दोन वर्षांच्या अपडेट योजनेत सात टक्के, तीन वर्षांच्या एफडी योजनेत 7.1% आणि पाच वर्षांच्या योजनेत 7.5% या दराने व्याज ऑफर केले जात आहे.
5 वर्षांसाठी दोन लाख रुपये गुंतवले तर
पोस्टाच्या पाच वर्षांच्या एफडी योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाख रुपयांचे गुंतवणूक केले तर त्याला 7.5% या इंटरेस्ट रेट ने दोन लाख 89,990 रुपये मिळणार आहेत म्हणजेच 89 हजार 990 रुपये हे व्याज म्हणून मिळणार आहेत.