Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर सरकारी योजना या गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत.सरकारी योजनांमध्ये अनेक छोट्या बचत योजना तर आहेतच परंतु बँक आणि पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत.
यामध्ये पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक छोट्या छोट्या योजना असून या माध्यमातून देखील तुम्ही छोट्यातील छोटी रक्कम गुंतवून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. त्यामुळे या लेखांमध्ये आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका महत्त्वाच्या योजनेची माहिती घेणार आहोत जी तुम्हाला अगदी पाचशे रुपये गुंतवून देखील लखपती बनवू शकते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना ही खूप महत्त्वाची असून या अंतर्गत तुम्हाला 7.1% वार्षिक व्याज मिळते. त्यामध्ये प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक तुम्हाला लखपती बनवू शकते. या योजनेमध्ये तुम्हाला खाते उघडण्यासाठी कमीत कमी पाचशे रुपये लागतील व एका आर्थिक वर्षात कमीत कमी पाचशे रुपयांची ठेव ठेवणे तुम्हाला आवश्यक आहे.
यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक दीड लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पंधरा वर्षांमध्ये ही योजना परिपक्व होते व तुम्हाला हवे असल्यास तुम्ही परिपक्वतेनंतर योजनेतील संपूर्ण पैसे देखील काढू शकतात. जर तुम्हाला मात्र पैशांची आवश्यकता नसेल तर तुम्ही प्रत्येकी पाच वर्षांकरिता यामध्ये मुदतवाढ देखील तुम्हाला घेता येते.
खाते उघडल्याच्या किती वर्षानंतर तुम्हाला पैसे काढता येतात?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ खाते उघडल्याच्या वर्षानंतर पाच वर्षापर्यंत या खात्यातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे काढता येत नाहीत. मात्र हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर फॉर्म दोन भरून तुम्हाला पैसे मिळतात. तसेच तुम्ही जर 15 वर्षांपूर्वी पैसे काढले तर तुमच्या जमा रकमेतून एक टक्के कपात केली जाते.
प्रत्येक महिन्याला
पाचशे रुपये गुंतवणूक केल्यास मिळतील एक लाख 63 हजार रुपयेपब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक महिन्याला पंधरा वर्षापर्यंत पाचशे रुपये गुंतवले तर तुम्हाला एक लाख 63 हजार रुपयांचा निधी मिळतो. त्याशिवाय तुम्ही प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला पंधरा वर्षानंतर सुमारे 3.25 लाख रुपये मिळतात.
या योजनेचे खाते कुणाला उघडता येते?
कोणतेही व्यक्ती कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन स्वतःच्या नावाने खाते उघडू शकते.तसेच एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचे खाते उघडायचे असेल तर कोणतीही व्यक्ती ते उघडू शकते.
दरमहा किती पैसे गुंतवल्यास पंधरा वर्षानंतर किती पैसे मिळतील?
प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर तीन लाख 25 हजार रुपये, प्रत्येक महिन्याला तीन हजार गुंतवले तर पंधरा वर्षानंतर नऊ लाख 76 हजार रुपये, प्रत्येक महिन्याला दोन हजार गुंतवले तर पंधरा वर्षानंतर सहा लाख 50 हजार रुपये, प्रत्येक महिन्याला पाच हजार गुंतवले तर पंधरा वर्षानंतर 16 लाख 27 हजार रुपये आणि प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये गुंतवले तर पंधरा वर्षानंतर 32 लाख 54 हजार रुपये तुम्हाला मिळतील.