Post Office Scheme : अलीकडे गुंतवणूकदार FD मध्ये पैसा गुंतवत आहेत. देशात एफडी करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. महिला वर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात एफडी मध्ये पैसा गुंतवत असल्याचे चित्र आहे. मात्र एफडी मध्ये पैसा गुंतवताना एकरकमी गुंतवावा लागतो. पण, अनेकांना दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवायची असते. दरम्यान, जर तुमचाही असाच काहीसा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची आरडी योजना फायदेशीर ठरणार आहे.
पोस्टाच्या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवल्यास गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळणार आहे. गुंतवणूकदारांना पोस्टाच्या या आरडी योजनेतून अवघ्या 60 महिन्यांचा कालावधीत तब्बल 80 हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे.
80 हजाराच्या व्याजासाठी किती गुंतवणूक करावी लागणार
पोस्टाच्या आरडी योजनेत 6.7% वार्षिक व्याज दिले जात आहे. जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षाच्या आरडी योजनेत प्रत्येक महिन्याला सात हजार रुपयांची गुंतवणूक केली म्हणजेच वार्षिक 84 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटी वर चार लाख 99 हजार 564 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये गुंतवणुकीची रक्कम चार लाख वीस हजार रुपये एवढी राहणार आहे आणि उर्वरित रक्कम अर्थातच 79 हजार 564 रुपये व्याज राहणार आहे. अर्थातच महिन्याकाठी सात हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास 80 हजार रुपये निव्वळ व्याज म्हणून मिळणार आहेत.
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या पाच वर्षांच्या आरडी योजनेत दरमहा ५,००० रुपये गुंतवलेत म्हणजेच वार्षिक 60 हजार रुपये गुंतवलेत तर मॅच्युरिटी वर तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत.
यामध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे आणि उर्वरित 56 हजार 830 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आरडी मधून जे व्याज मिळते त्यावर टीडीएस लागत असतो. म्हणजेच आरडीमधून मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागतो.
आरडीतून जे व्याज मिळते त्यावर दहा टक्के टीडीएस लागतो. जर समजा आरडी योजनेतून मिळणारे मासिक व्याज हे ₹10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS द्यावा लागणार आहे.
विशेष म्हणजे आरडी योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर दिले जाणारे व्याज दर तीन महिन्यांनी रिवाईज केले जाते. म्हणजेच दर तीन महिन्यांनी नवीन व्याजदर लागू होत असतात.
एकतर व्याजदरात वाढ होत असते किंवा व्याजदर कमी होत असतो. यानुसार मग गुंतवणूकदारांना या योजनेतून परतावा मिळत असतो.