Post Office Scheme : पैसे कमवण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपल्या आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे पैसा वाढावा यासाठी प्रयत्नरत आहे. भविष्यात पैशांची चणचण भासू नये यासाठी बँकेच्या एफडी योजनेत, पोस्ट ऑफिस आणि एलआयसी च्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये देखील गुंतवणूक करतात. मात्र आजही आपल्या देशात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व आहे.
त्यामुळे जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टाच्या बचत योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण पोस्टाच्या अशाच एका बचत योजनेची माहिती पाहणार आहोत.
पोस्टाच्या या बचत योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे काही महिन्यातच डबल होणार आहेत. म्हणजे जर तुम्ही यामध्ये दोन लाख रुपये टाकले तर तुम्हाला चार लाख मिळणार आहेत.
कोणती आहे ती योजना?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे किसान विकास पत्र. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5% या इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्र ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे, ज्या अंतर्गत व्याज त्रैमासिक आधारावर सुधारित केले जाते.
या योजनेत तुम्ही निश्चित कालावधीत तुमचे पैसे दुप्पट करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.
कसे डबल होणार पैसे?
पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत (KVP) तुम्ही किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही हे विशेष. म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याला हवी तेवढी रक्कम तो यामध्ये गुंतवू शकतो.
ही योजना वार्षिक ७.५ टक्के दराने परतावा देते. खरे तर आधी 7.2% या दराने परतावा मिळत होता. पण, गेल्या वर्षी एप्रिल 2023 मध्ये हे व्याजदर 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहेत.
आधीच्या व्याजदरानुसार या योजनेत पैसे दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागायचे, परंतु आता 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे आणि सात महिन्यांत पैसे दुप्पट होत आहेत.
2 लाखाचे 4 लाख
किसान विकास पत्र योजनेत तुम्ही जर दोन लाख रुपये गुंतवले तर 115 महिन्यांनी तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 9 वर्ष आणि 7 महिने गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपये निव्वळ व्याज मिळणार आहे. किसान विकास पत्र या योजनेत तुम्ही सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट ओपन करू शकता.