आर्थिक

Post Office Scheme: पोस्टाच्या ‘या’ योजनेत 10 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल 20 लाखांचा परतावा! वाचा योजनेची संपूर्ण माहिती

Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक पर्याय उपलब्ध असून प्रत्येक गुंतवणूक पर्यायांची वैशिष्ट्ये वेगवेगळे असते. या सगळ्या पर्यायांचा तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करून गुंतवणूकदार हे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतात. गुंतवणूक करताना केलेल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या दोन्ही बाबतीत ज्या ठिकाणी गुंतवणूकदारांचे समाधान होते  अशाच ठिकाणी गुंतवणूकदार हे गुंतवणूक करत असतात.

सध्या म्युच्युअल फंड तसेच शेअर मार्केट, एलआयसी किंवा इतर शासकीय गुंतवणूक योजनांचा देखील गुंतवणुकीसाठी विचार केला जातो. या दृष्टिकोनातून जर आपण सरकारच्या गुंतवणूक योजनांचा विचार केला तर बचतीला प्रोत्साहन मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून 12 प्रकारच्या अल्पबचत योजना राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे या योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येतात. म्हणून त्यांना आपण पोस्ट ऑफिसच्या योजना म्हणून देखील ओळखतो.

पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांचे महत्त्व म्हणजे अगदी अल्पवयीन मुली पासून ते महिला  आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील अनेक योजनांच्या माध्यमातून गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बऱ्याच योजनांमधून केलेल्या गुंतवणुकीवर व्याजाच्या रूपात देखील चांगली कमाई करता येते व परतावा देखील चांगला मिळतो.

अशीच एक पोस्ट ऑफिसची महत्त्वाची योजना असून केलेल्या गुंतवणुकीवर दुप्पट परतावा हवा असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र बचत योजना ही खूप महत्त्वपूर्ण अशी योजना असून या योजनेच्या परिपक्वता कालावधी आधी तुमची गुंतवणूक किंवा तुम्ही ठेवलेली ठेव दुप्पट होऊ शकते.

 किसान विकास पत्र योजनेमध्ये कशी होते रक्कम दुप्पट?

या योजनेमध्ये जर दीर्घ कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक केली तर त्याला दुप्पट परतावा मिळतो. सध्या जर आपण ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचा विचार केला तर सरकारकडून याकरिता 7.5% चा व्याजदर निश्चित करण्यात आला असून  या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो. किसान विकास पत्र योजना ही बचत योजना असून छोटी बचत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेमध्ये तुम्ही 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात व जास्तीत जास्त गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा नाही.

 दहा लाखाच्या गुंतवणूक वर मिळतो 20 लाखाचा परतावा

किसान विकास पत्र योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर जर तुम्ही  9वर्ष सात महिन्यांकरिता म्हणजेच 115 महिन्यांसाठी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 9 वर्ष सात महिन्याच्या कालावधीत गुंतवलेली रक्कम 20 लाख रुपये इतकी मिळते किंवा वीस लाख रुपये पर्यंत ती वाढते.

 किसान विकास पत्र योजनेत एका खात्यात किती लोक करू शकतात गुंतवणूक?

या योजनेमध्ये तुम्ही व्यक्तिगत किंवा एकल खाते उघडू शकतात किंवा संयुक्त खाते देखील उघडू शकतात. तसेच मुदत पूर्ण होणे आधीच गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर खात्यातील रक्कम व परतावा हा कायदेशीर वारसाला दिला जातो. समजा तुम्ही या योजनेत गुंतवणूक केलेली आहे व मध्येच तुम्हाला पैशांची गरज भासली तर ही योजना परिपक्व होण्याआधी गुंतवणूकदार किसान विकास पत्र खाते बंद देखील करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts