आर्थिक

Post Office Scheme: होणार बंपर कमाई ! ‘ही’ योजना करणार फक्त 120 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट; जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

Post Office Scheme: तुमच्या भविष्याचा विचार करून तुम्ही देखील कमी वेळेत जास्त नफा देणारी सरकारी योजना शोधात असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका मस्त आणि कमी वेळेत जास्त पैसे देणाऱ्या योजनाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे आणि फक्त 120 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करून देते. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला येथे सांगतो आम्ही पोस्ट ऑफिसच्या सुपर हिट योजना किसान विकास पत्र योजनेबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत. या योजनेमध्ये देशातील तब्बल लाखो लोक आपली गुंतवणूक करत असून तुम्ही देखील गुंतवणूक करून कमी वेळेत जास्त फायदा प्राप्त करू शकतात.

हे जाणून घ्या कि स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये, व्याज दर दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर निश्चित केले जातात. 1 जानेवारी 2023 रोजी सरकारने किसान विकास पत्रामध्ये उपलब्ध व्याजदरात बदल केला आहे. सध्या, त्यावर वार्षिक आधारावर 7.2 टक्के दराने व्याज मिळते.  तुम्ही या योजनेत 1,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. किसान विकास पत्रातील तुमची गुंतवणूक 120 महिन्यांत म्हणजे सध्याच्या व्याजदरानुसार 10 वर्षांत दुप्पट होते.

 करात सूट मिळेल का?

बँक बाजारने दिलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र योजना आयकर कायदा, 1961 अंतर्गत येते. त्यामुळे यामध्ये 80C अंतर्गत कर सूट मिळू शकते. जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील शेअर करावे लागतील. तुम्ही हमी म्हणून किसान विकास पत्र योजनेचा वापर करून कर्ज देखील घेऊ शकता.

या पोस्ट ऑफिस योजनेचा इतिहास काय आहे?

भारतीय पोस्ट ऑफिसने 1988 मध्ये ही योजना सुरू केली. ही योजना भारत सरकारने देशातील लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणली होती. ही योजना सुरू झाल्यापासून खूप लोकप्रिय झाली असली तरी 2011 मध्ये या योजनेचा मनी लॉन्ड्रिंगसाठी गैरवापर होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात आले.

2014 मध्ये अनेक बदलांसह ही योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. या बदलांमध्ये एकाचवेळी 50 हजारांहून अधिक गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड आवश्यक करण्यात आले असून 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी उत्पन्नाच्या स्रोताचा पुरावा अनिवार्य करण्यात आला आहे.

हे पण वाचा :- Budh Dosha Upay: बुध दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी करा ‘हा’ उपाय ; मिळणार मोठा लाभ

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts