आर्थिक

Post Office Scheme : आनंदाची बातमी , ‘या’ लोकांना मिळणार आता 10 लाख रुपये, जाणून घ्या कसे

Post Office Scheme :  जर तुम्हीही लखपती होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या आपल्या देशात एकापेक्षा एक जबरदस्त योजना सुरु करण्यात आले आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकतात.

तुम्हीही या योजनांमध्ये सहभागी होऊन तुमचे  लखपती  होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही ज्या योजनेबद्दल सांगणार आहोत ती पोस्ट ऑफिसची आहे. त्यात गुंतवणूक करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.

देशातील बड्या संस्थांमध्ये गणल्या जाणार्‍या पोस्ट ऑफिसची उत्कृष्ट योजना टाइम डिपॉझिट आजकाल लोकांची मने जिंकण्याचे काम करत आहे. यामध्ये तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळत आहे, ज्यामुळे लोक श्रीमंत होताना दिसत आहेत. या योजनेत तुम्हाला बंपर फायदा मिळू शकतो.

योजनेत गुंतवणूक करून तुम्ही 1.5 लाखांपर्यंतचे कर लाभ देखील मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही 1 ते 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही त्यात एका वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.8% चा फायदा मिळेल. यामध्ये 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 6.9% परतावा मिळतो आणि त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5% परतावा मिळतो.

असे मिळणार 10 लाख रुपये

तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारे 5 वर्षांसाठी चालवल्या जाणार्‍या टाइम डिपॉझिटमध्ये 5 लाख रुपये गुंतवत आहात. त्यावर 7.5 टक्के व्याजदराने लाभ देण्याचे काम केले जाणार आहे. इतकेच नाही तर मॅच्युरिटीनंतर म्हणजेच 5 वर्षानंतर तुमचे उत्पन्न 7,24,149  रुपये असेल. जर तुम्ही ती आणखी 5 वर्षे वाढवली तर उत्पन्न 10,00,799 रुपये होईल.

हे पण वाचा :- Affordable EV Cars : 300 किमी रेंजसह ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ दमदार इलेक्ट्रिक कार, पहा संपूर्ण लिस्ट

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts