Post Office Scheme:- आपण किती पैसा कमावतो त्यापेक्षा तुम्ही कमवलेल्या पैशांची बचत आणि त्या बचतीची गुंतवणूक कशा पद्धतीने करतात याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे बचत आणि गुंतवणूक या बाबी भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत.
जर आपण सध्या परिस्थिती पाहिली तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बँकांपासून ते पोस्ट ऑफिस पर्यंत अनेक योजना या गुंतवणुकीसाठी फायदेशीर आणि सुरक्षित मानल्या जातात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना देखील गुंतवणुकीपासून मिळणारा परतावा आणि गुंतवणुकिची सुरक्षितता या दृष्टीने खूप फायद्याच्या असल्याचे आपल्याला माहिती आहे.
पोस्ट ऑफिसच्या अनेक महत्त्वाच्या अशा गुंतवणूक योजना आहेत व त्यातीलच एक योजना पाहिली तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही होय. ही एक छोटी बचत योजना असून अगदी छोट्या छोट्या बचतीतून या माध्यमातून तुम्ही कमाई करू शकता. त्यामुळे या योजनेविषयी आपण माहिती बघू.
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना आहे फायद्याची
पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांपैकी मासिक उत्पन्न योजना ही चांगल्या परताव्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर अशी योजना आहे. या सरकारच्या योजनेमध्ये पती-पत्नी एकत्रित खात्याद्वारे प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळवू शकतात आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये एकरकमी गुंतवणूक करावी लागते.
या मासिक उत्पन्न योजना अर्थात मंथली इन्कम स्कीमच्या मदतीने तुम्ही प्रत्येक महिन्याला निश्चित उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेमध्ये संयुक्त खाते उघडण्याची देखील मुभा आहे. यामध्ये तुम्हाला एकट्याला म्हणजेच एकल आणि पती-पत्नी मिळून संयुक्त असे दोन्ही प्रकारचे खाते उघडता येऊ शकतात.
या खात्यामध्ये तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते व या योजनेची मुदत ही पाच वर्षे आहे. आपण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजाचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून एक एप्रिल 2023 पासून या योजनेतून मिळणाऱ्या व्याजदर हा 7.4% केला आहे.
या योजनेतून प्रत्येक महिन्याला तुम्हाला कसे मिळेल उत्पन्न?
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत एका खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा करता येऊ शकतात व जर संयुक्त खाते उघडले असेल तर यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पंधरा लाख रुपये ठेवू शकतात. या योजनेतून 7.4% इतका व्याजदर वार्षिक पद्धतीने मिळत आहे.
यामध्ये तुम्ही गुंतवलेली मुद्दल रक्कम पाच वर्षाच्या परिपक्वते कालावधीनंतर परत केली जाते. तसेच तुम्हाला यामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही त्यात पाच वर्षांची वाढ करू शकतात. या योजनेत प्रत्येक पाच वर्षांनी तुम्हाला तुमची मूळ रक्कम काढण्याचा किंवा या योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.
या योजनेत उघडलेल्या खात्याच्या माध्यमातून तुम्हाला जे काही व्याज मिळते ते दर महिन्याला तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये जमा केली जाते. समजा यामध्ये पती-पत्नी म्हणून जर तुम्ही 15 लाख रुपये जमा केले तर 7.4% व्याजदराने वर्षाला तुम्हाला एक लाख 11 हजार रुपये व्याज मिळते व जर तुम्ही त्या अकरा महिन्यांमध्ये वितरित केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळतात.
तसेच संयुक्त खात्यामध्ये यातून मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्याला सारखेच दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला उघडलेले संयुक्त खाते एकल खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकतात.
या योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी
या योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा आहे व तुम्ही ठेव ठेवल्याच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला या माध्यमातून पैसे काढता येऊ शकतात.
जर तुम्ही या योजनेचे नियम पाहिले तर त्यानुसार एक ते तीन वर्षाच्या दरम्यान जर पैसे काढले तर तुमच्या एकूण जमा रकमेपैकी दोन टक्के रकमेची कपात केली जाईल व तुम्हाला ती परत केली जाते. तुम्ही खाते उघडल्यानंतर जर तीन वर्षाच्या मुदतीपूर्वी पैसे काढले तर ठेवीतील एक टक्के कपात केली जाते व तुम्हाला रक्कम परत केली जाते.