आर्थिक

Post Office Scheme : मस्तच ! पोस्ट ऑफिसची ही योजना 5 लाखांच्या गुंतवणुकीवर देईल 10 लाख रुपये, जाणून घ्या

Post Office Scheme : आजकाल अनेकांना गुंतवणूक करायची असते. मात्र गुंतवणूक कुठे करायची हे अनेकांना माहिती नसते. अनेकजण पुढील भविष्यासाठी किंवा मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. मात्र त्यांना गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळत नाही.

अनेकदा गुंतवणूक करत असतात काही चुका केल्या जातात त्यामुळे अनेकांना नफा तर सोडाच गुंतवणूक केलेले पैसे देखील मिळत नाहीत. गुंतवणूक करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. काहीजण सरकारी तर काहीजण खाजगी योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात.

तुम्हालाही कमी कालावधी गुंतवणुकीतून दुप्पट पैसे हवे असतील तर सरकारच्या पोस्ट ऑफिसमधील योजना सर्वोत्तम पर्याय आहेत. या ठिकाणी तुम्ही बिनधास्त पैसे गुंतवणूक करून दुप्पट पैसे कमवू शकता.

पोस्ट ऑफिस योजनेतील FD हा एक तुम्हाला गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. FD हा पर्याय सर्व बँकेमध्ये देखील मिळेल. मात्र बँकेतील FD मध्ये पैसे गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या FD मध्ये गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या एफडीला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट म्हणतात. पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी FD चा पर्याय देण्यात आला आहे. या योजनेमध्ये तुम्ही 10 वर्षांसाठी पैसे ठेवल्यास दुप्पट रक्कम मिळेल. 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे.

दुप्पट पैसे कसे कमवायचे ते जाणून घ्या

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये 5 लाख रुपये 5 वर्षांसाठी जमा केले तर तुम्हाला त्यावर 7.5 टक्के दराने 2,24,974 लाख रुपये व्याज दिले जाईल.

एकूण तुम्हाला 7,24,974 रुपये दिले जातील. जर तुम्ही पुन्हा हे पैसे 5 वर्षांसाठी एफडीमध्ये जमा केले तर तुम्हाला 10,51,175 रुपये दिले जातील.

1 ते 5 वर्षांच्या FD वर व्याज

1 वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर – 6.9%

2 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर – 7.0%

3 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर – 7.0%

5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर – 7.5%

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts