Post Office Scheme :- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक बचत योजना विविध माध्यमातून राबवल्या जातात. केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार देखील चांगले योजनांच्या शोधात असतात. जर सर्वसाधारणपणे आपण गुंतवणुकीचा ट्रेंड पाहिला तर शेअर मार्केट पासून ते म्युच्युअल फंड, तसेच सोने आणि चांदी,रियल इस्टेट क्षेत्रामध्ये देखील बरेच गुंतवणूकदार गुंतवणूक करतात.
परंतु यासोबतच पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक प्रकारच्या बचत योजना असून त्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजना गुंतवणुकी करिता सुरक्षित जोखीममुक्त परताव्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत.पोस्ट ऑफिसच्या अनेक लोकप्रिय योजना असून त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना अर्थात एमआयएस योजना होय.
काय आहे पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना?
पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही एक लोकप्रिय योजना असून त्यामध्ये व्यक्तिगतरीत्या म्हणजेच एका व्यक्तीला आणि संयुक्त म्हणजेच तीन व्यक्तींपर्यंत दोन्ही खाते उघडता येणे शक्य आहे. पाच वर्ष परिपक्वता कालावधी असलेल्या या योजनेवर एक एप्रिल 2023 पासून 7.4% व्याज देण्यात येत आहे.
या योजनेमध्ये तुम्ही खाते उघडल्याच्या तारखेपासून जेव्हा एक महिना पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून व्याजाचा लाभ दिला जातो. याचा अर्थ असा होतो की तुम्हाला व्याजाचा लाभ हा एका महिन्याच्या आधारावर म्हणजेच मासिक आधारावर मिळतो. यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमध्ये एक हजार रुपयांमध्ये तुम्हाला खाते उघडता येणे शक्य आहे. एक हजार रुपयांमध्ये तुम्ही एकल किंवा संयुक्त असे दोनही प्रकारचे खाते उघडू शकतात.
किती रुपयापर्यंत करता येते गुंतवणूक?
पोस्ट ऑफिसच्या या एमआयएस अर्थात मासिक उत्पन्न योजनेमध्ये एका खात्यात कमाल नऊ लाख रुपये जमा करता येणे शक्य आहे. तसेच खाते जर संयुक्त असेल तर अशा खात्यामध्ये तुम्ही कमाल 15 लाख रुपये जमा करू शकता. या योजनेच्या माध्यमातून दसादशे 7.4% एवढा व्याज दर असून यामधील मूळ रक्कम तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही पाच वर्षाचे मुदतीनंतर ते काढू शकतात. जर तुम्हाला रक्कम काढायची नसेल तर तुम्ही पाच पाच वर्ष अशा पद्धतीने या योजनेत वाढ देखील करू शकतात.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या खात्यावर तुम्हाला जे काही व्याज मिळते ते तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये जमा केले जाते. समजा तुम्हाला काही गरज आहे किंवा काही कारणास्तव तुम्हाला या योजनेची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच खाते बंद करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता. याकरिता गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे.
म्हणजेच गुंतवणूक सुरू केल्याच्या तारखेपासून एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर व तीन वर्षांपूर्वी गुंतवणूकदाराने खाते बंद केले तर गुंतवणूक केलेल्या रकमेपैकी दोन टक्के रक्कम वजा केली जाते व उरलेली रक्कम संबंधितांना मिळते. तसेच खाते तीन वर्षानंतर आणि पाच वर्षे पूर्ण होण्याआधी जर बंद केले तर एकूण तुमच्या मूळ रकमेच्या जमा झालेल्या मुद्दलाच्या एक टक्के इतकी रक्कम वजा केली जाते व उरलेली रक्कम तुम्हाला दिली जाते.
पत्नीच्या नावे एमआयएसमध्ये खाते उघडल्यास मिळतात हे लाभ
पोस्टाच्या या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला उत्पन्नाची गॅरंटी दिली जाते. उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा पती आणि पत्नी असे दोघे मिळून जर या योजनेत संयुक्त उघडले आणि यामध्ये जर 15 लाख रुपये जमा केले तर 7.4% वार्षिक व्याजदराने एक लाख 11 हजार रुपये व्याज दिले जाते व जर तुम्ही बारा महिन्यांमध्ये विभाजित केले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला नऊ हजार दोनशे रुपये इतके हमी उत्पन्न मिळते. समजा या योजनेच्या नियमानुसार जर दोन किंवा तीन लोकांनी संयुक्त खाते उघडले असेल तर या खात्याच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळते ते प्रत्येक सदस्याला समानरूपाने दिले जाते.