Post Office Superhit Scheme : जर तुम्ही लहान गुंतवणूक योजना शोधत असाल तर पोस्टाची RD योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. जिथे तुम्ही अगदी लहान बचत करून चांगली कमाई करू शकता. RD हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत जाऊन उघडू शकता.
लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम जमा करावी लागते. पोस्ट ऑफिस आरडीवर सध्या ६.७ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिस आरडी खात्यावर केवळ हमी व्याजच उपलब्ध नाही, तर गरजेनुसार स्वस्त आणि सुलभ कर्जही उपलब्ध होईल.
RD खाते पोस्ट ऑफिसमध्ये किमान मासिक हप्त्याने 100 रुपये भरून उघडता येते. यामध्ये कोणतीही कमाल ठेव मर्यादा नाही. आरडी 3 वर्षांनंतर वेळेपूर्वी बंद होऊ शकते. याशिवाय, मॅच्युरिटीनंतर खाते आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याची देखील सुविधा आहे.
कर्जाची सुविधा
पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, जर RD खात्यामध्ये 12 हप्ते जमा केले गेले असतील आणि 1 वर्ष चालू राहिल्यानंतर खाते बंद केले गेले नसेल, तर खातेदार कर्ज घेऊ शकतात. नियमांनुसार, RD मधील शिल्लक रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्जाची रक्कम म्हणून मिळू शकते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा समान मासिक हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते.
पोस्ट ऑफिस RD वर कर्ज घेण्याचा व्याजदर बँकांकडून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत कमी आहे. नियमांनुसार, RD खात्यावरील कर्जावरील व्याज हे RD खात्यातील ठेवींवरील व्याजदरापेक्षा 2% जास्त आहे. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर वार्षिक व्याजदर ६.७ टक्के आहे, म्हणजे कर्ज घेतल्यास, कर्जावरील व्याजदर ८.७ टक्के असेल.
RD वरील कर्जाच्या बाबतीत, कर्जाची रक्कम वितरित केल्याच्या तारखेपासून कर्ज परतफेडीच्या तारखेपर्यंत व्याजाची गणना केली जाईल. RD चा परिपक्वता कालावधी 5 वर्षे आहे. मुदतपूर्तीचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, कर्ज आणि व्याज आरडी खात्याच्या परिपक्वता मूल्यातून वजा केले जाईल.