Post Office Saving Schemes : गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्यासाठी केवळ गुंतवणूक पुरेशी नाही, तर कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हे देखील खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय कोणत्याही योजनेत तुमचे पैसे सुरक्षित आहे याची खात्री करून घ्यावी. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, जी सुरक्षेसह उत्तम परतावा ऑफर करते.
आम्ही पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल बोलत आहोत. जी केवळ सुरक्षितच नाही तर देशातील अनेक मोठ्या बँकांपेक्षा आपल्या ग्राहकांना जास्त परतावा देखील देत आहे. या योजनेत किती टक्के व्याज उपलब्ध आहेत बँका या तुलनेत किती परतावा देत आहेत हे जा आपण पाहणार आहोत. चला तर मग…
पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमचे व्याजदर वित्त मंत्रालय दर तिमाहीत सुधारित करतात. या मालिकेत, अर्थ मंत्रालयाने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी नवीन व्याजदर देखील जाहीर केले आहेत, जे 1 जुलैपासून लागू होतील आणि 30 सप्टेंबरपर्यंत लागू असतील. केंद्र सरकारने जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी व्याजदर अपरिवर्तित ठेवले आहेत. सध्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीमवर ७.७ टक्के व्याज दिले जात आहे, जे अनेक बँकांपेक्षा जास्त आहे.
१८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत खाते उघडू शकते. तर पालक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावर खाते उघडू शकतात. या योजनेत ५ वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान रक्कम 1000 आहे, तर आणखी रक्कम 100 च्या पटीत जमा करता येते. म्हणजे कमाल रकमेवर मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यास कोणतीही मर्यादा नाही. NSC ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होते.
दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, पाच वर्षांच्या मुदतीच्या FD वर सर्वसामान्य नागरिकांना ६.६० टक्के परतावा देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याजदर देत आहे.
एचडीएफसी बँक पाच वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के परतावा देत आहे.
ICICI बँक सर्वसामान्य नागरिकांसाठी ६.९० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.४० टक्के व्याजदर ५ वर्षांच्या कालावधीसाठी देत आहे.
तर ॲक्सिस बँक पाच वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांसाठी ७ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याजदर देत आहे.