Post Office Vs Bank RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आणि जिथे चांगले रिटर्न मिळतात त्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी अलीकडे पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे.
याशिवाय, पोस्ट ऑफिसची आरडी योजना आणि बँकांच्या आरडी योजनेत देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. दरम्यान, आज आपण पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे की बँकांच्या आरडी योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खरे तर विविध बँकांच्या माध्यमातून आरडीसाठी वेगवेगळे व्याजदर ऑफर केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण पोस्ट ऑफिसचे आरडी वरील व्याजदर आणि बँकांचे आरडी वरील व्याजदर कसे आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
SBI चे RD वरील व्याजदर : मिळालेल्या माहितीनुसार देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना RD वर 6.5% ते 7% या इंटरेस्ट रेटने व्याज देत आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना सात टक्के ते 7.50 % यादरात व्याज दिले जात आहे.
आयसीआयसीआय बँकेचे आरडी वरील व्याजदर :
ICICI बँक RD वर सामान्य ग्राहकांना 4.75 टक्के ते 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.25 टक्के ते 7.50 टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे.HDFC बँक : HDFC ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आरडीवर 4.50% ते 7.10% एवढे व्याज देत आहे.
येस बँक : येस बँक या प्रायव्हेट सेक्टरमधील बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आरडीवर 6.10% ते 7.75 टक्के या रेटने व्याज दिले जात आहे.
पोस्ट ऑफिस ची आरडी योजना : बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस कडून देखील आर डी ऑफर केली जात आहे. पोस्टाच्या माध्यमातून पाच वर्षांच्या आरडीवर आपल्या ग्राहकांना 6.8% इंटरेस्ट रेटने व्याज दिले जात आहे.