Post Office Saving Schemes : सध्या देशभरात अनेक योजना सुरू आहेत, ज्या सामान्य लोकांपासून विशेष लोकांपर्यंत सर्वांना श्रीमंत बनवत आहेत. या योजनांचा लाभ तुम्ही देखील सहजपणे घेऊ शकता. तसेच बाजारात पोस्टाच्या देखील योजना लोकप्रिय आहेत, आम्ही तुम्हाला अशाच योजनेबद्दल सांगणारा आहोत, जी तुम्हाला दीर्घकाळात श्रीमंत बनवण्याचे काम करते.
पोस्ट ऑफिसने सुरू केलेली योजना मुदत ठेव म्हणजेच एफडी जी प्रत्येकाला श्रीमंत बनवत आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर अल्पावधीत बंपर व्याजाचा लाभ मिळत आहे. एवढेच नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एफडी मध्ये तिप्पट नफा मिळवू शकता. तिप्पट फायदा कसा मिळवायचा, हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग…
पोस्ट ऑफिसमधून बंपर रिटर्न मिळवायचे असतील तर तुम्ही येथे ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवू शकता. तसेच ही गुंतवणूक पाच वर्षांसाठी करावी लागेल. पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या FD वर 7.5 टक्के व्याज सहज देत आहे.
अशास्थितीत 5 वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम 7,24,974 रुपये असेल. जर तुम्हाला आणखी रक्कम वाढवायची असेल तर ती रक्कम लगेच कडू नका त्यात आणखी पाच वर्षांची वाढ करा. अशाप्रकारे, दहा वर्षांत तुम्हाला 5 लाख रुपयांच्या व्याजाद्वारे 5,51,175 रुपये मिळतील, यानुसार तुमची रक्कम 10,51,175 रुपये होईल. ही रक्कम दुपटीहून अधिक आहे.
जर तुम्ही रक्कम एकूण १५ वर्षांसाठी जमा केली तर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी, पाच लाखावर केवळ व्याजातूनच 10,24,149 मिळतील. या ऑफरसह, तुम्हाला एकूण 15,24,149 रुपयांचा परतावा मिळू शकेल, ज्यामध्ये 10,24,149 लाख रुपये फक्त व्याजातूनच मिळतील. या रकमेतून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवी करून मोठा परतावा गोळा करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, जो आजकाल लोकांची मने जिंकत आहे.