PPF Balance : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा या लोकांना होतो. त्यापैकीच एक योजना म्हणजे PPF होय. अनेकजण सरकारच्या या योजनेमध्ये पैसे गुंतवत आहेत.
जर तुम्हीही या योजनेमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीपूर्वी या योजनेबद्दल सर्व माहिती असावी. नाहीतर तुम्हाला देखील इतरांप्रमाणे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या सविस्तरपणे.
जाणून घ्या पीपीएफ योजना
पीपीएफ ही एक प्रकारची दीर्घकालीन बचत योजना असून या योजनेतील 15 वर्षांच्या गुंतवणुकीवर मॅच्युरिटी उपलब्ध असते. या योजनेत गुंतवणूकदारांना प्रत्येक वर्षी पैसे गुंतवावे लागत असतात. या योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच, समजा एखाद्या गुंतवणूकदाराने कोणत्याही आर्थिक वर्षासाठी या योजनेत गुंतवणूक केली नसेल तर त्याला अडचण येईल. परिणामी त्याचे पीपीएफ खाते निष्क्रिय होण्याची शक्यता असते.
लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी
खरंतर पीपीएफ योजनेत गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदारांना याची काळजी घ्यावी लागते. हे लक्षात घ्या की एका आर्थिक वर्षात PPF योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. गुंतवणूकदारांना या योजनेत कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते. तर त्याच वेळी, आयटीआर दाखल करत असताना जुन्या कर प्रणाली अंतर्गत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेद्वारे 1.5 लाख रुपयांचा कर लाभ देखील मिळेल.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ खात्यामध्ये वर्षभरात 500 रुपयांची गुंतवणूक केली नाही तर त्यांना खूप नुकसान सहन करावे लागेल. कारण यामुळे त्या गुंतवणूकदाराचे खाते निष्क्रिय होते. तसेच पीपीएफ खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर देखील त्याचा खूप मोठा परिणाम होतो. इतकंच नाही तर आता निष्क्रिय खाते पुन्हा चालू करायचे असल्यास शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की गुंतवणूकदाराना दरवर्षी पीपीएफ खात्यात कमीत कमी गुंतवणूकीची रक्कम जमा करावी लागणार आहे.