PPF Scheme : सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला करोडो रुपयांचा फायदा होतो. परंतु जर तुम्ही चुकीच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसतो.
अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशीच एक योजना म्हणजे पीपीएफ होय. सध्या लाखो लोक यात गुंतवणूक करून पैसे कमावत आहेत. जर तुम्ही यात 411 रुपयांची गुंतवणुक केली तर तुम्हाला करोडो रुपये मिळतील.
हे लक्षात घ्या की PPF ही एक अतिशय लोकप्रिय छोटी बचत योजना असून यात अनेकजण जास्तीत जास्त पैसे गुंतवत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला आर्थिक फटका बसत नाही. तर ते अगदी सुरक्षित राहतात. त्याची हमीही केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
किती करता येईल गुंतवणूक
या योजनेत प्रत्येक वर्षी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. 1 वर्षात 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा करण्यात आलेल्या पैशांवर कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे या योजनेत तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे जमा करता येते. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केली नसून या योजनेत गुंतवणूक केली तर 7.1 टक्के दराने व्याज मिळते.
करात मिळेल सवलत
महत्त्वाचे म्हणजे कर सवलतीच्या बाबतीत ही एक उत्तम योजना आहे. त्यामुळे ही योजना नोकरदार लोकांमध्ये खूप लोकप्रिय असून यात आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवता येते. हे लक्षात घ्या की पीपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्ती पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम, तिन्ही पूर्णपणे करमुक्त असतात. तुम्हाला PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तर मॅच्युरिटीनंतर, खाते 5-5 वर्षांसाठी सक्रिय असते.
असे व्हा करोडपती
आता तुम्ही या सरकारी योजनेत थोडे पैसे जमा केले तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. यात दिवसाला फक्त 411 रुपये म्हणजेच एका वर्षात 1.5 लाख रुपये जोडले तर सध्याच्या 7.1 टक्के व्याजदराच्या आधारे तुम्हाला एकूण 25 वर्षांत 1.3 कोटी रुपयांचा निधी उभारता येतो.