PPF Update : पीपीएफ ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. ही गुंतवणूक योजना निवृत्तीनंतर तुमच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करते. PPF च्या नियमांनुसार, गुंतवणूकदार त्यांच्या PPF खात्यात 100 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरु करू शकतो. तुम्ही पीपीएफ खाते कोणत्याही जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन उघडू शकतात.
पीपीएफ ही सरकारी योजना असून, येथिक गुंतवणूक एकदम सुरक्षित आहे. अशातच जर तुम्हाला या गुंतवणुकीतून करोडपती व्हायचे असेल तर त्या गुंतवणूकदाराला नियमितपणे खात्यात पैसे जमा करावे लागतात, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
PPF खात्याचे नियम
माहितीसाठी, पीपीएफ खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. PPF खात्यात 15 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. ज्यामध्ये एक कमावती व्यक्ती एका वर्षात जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये केवळ 1.5 लाख रुपये जमा करू शकते.
पीपीएफ खात्याचे फायदे :-
पीपीएफ खाते EEE श्रेणीमध्ये येते. जिथे एखादी व्यक्ती कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक ठेवीवर आयकर लाभाचा दावा करू शकते. याशिवाय पीपीएफ मॅच्युरिटी रकमेवरही कर लाभ मिळतो.
PPF वर व्याज दर 7.1 टक्के आहे आणि तो तिमाही आधारावर दिला जातो. PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. पण गुंतवणूकदार पीपीएफची मॅच्युरिटी संपली तरी खाते पुढे चालू ठेवू शकतो. मॅच्युरिटीनंतर, खातेदाराला हवे असल्यास तो 5 वर्षांसाठी आणखी त्यात वाढ करू शकतो.
PPF कॅल्क्युलेटर म्हणजे काय ?
जर एखाद्या कमावत्या व्यक्तीने वयाच्या ३० व्या वर्षी पीपीएफ खाते उघडले आणि पीपीएफ खाते तीन वेळा वाढवले, तर अशा स्थितीत पीपीएफ खातेधारक ३० वर्षांसाठी खात्यात गुंतवणूक करू शकेल.
अशा परिस्थितीत, समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पीपीएफ खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपये गुंतवले, तर 30 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर, पीपीएफवरील 7.10 टक्के व्याजावर आधारित, त्याला सुमारे 1.54 कोटी रुपये मिळतील.
पीपीएफ कॅल्क्युलेटरच्या गणनेवर आधारित, जर तुम्ही 30 वर्षांच्या गुंतवणुकीत दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले तर ही रक्कम 45 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीनंतर तुम्ही ही रक्कम आणखी पाच वर्ष गुंतवता. अशा स्थितीत यावर एकूण 1 कोटी 9 लाख 50 हजार 911 रुपये व्याज मिळतील.