Profitable Business Idea:- सध्या देशांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा खूप गंभीर स्वरूपात असून दरवर्षी शाळा आणि महाविद्यालयांमधून पदव्या घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे.
अशा बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसाय करण्यासाठी पाठबळ मिळावे याकरिता शासनाच्या देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम सरकारच्या माध्यमातून पार पाडण्यात येते. आता व्यवसाय करायचे म्हटले म्हणजे अनेक छोटे-मोठे व्यवसायांची यादी मोठी तयार होते.
परंतु यामध्ये जर तुम्ही एखाद्या सरकारच्या संस्थेसोबत व्यवसाय केला तर नक्कीच तो फायद्याचा ठरू शकतो. नेमके सरकारी संस्थेसोबत कसा व्यवसाय करता येतो किंवा कुठल्या संस्था व्यवसाय करण्यासाठी फायद्याचे आहेत हे देखील महत्त्वाचे असून यासंबंधीचेच माहिती आपण लेखात घेणार आहोत.
पोस्ट ऑफिस सोबत सुरू करू शकता तुम्ही तुमचा व्यवसाय?
तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस सोबत व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रेंचाईजी घेऊन तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. सध्या देशामधील जे काही पोस्ट ऑफिस आहेत त्यांच्या कार्याचा विस्तार आता मोठ्या प्रमाणावर झाला असून शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना किंवा सोयीसुविधा राबवल्या जातात त्यांचा विस्तार हा पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सध्या पोस्ट ऑफिस स्टेशनरी पाठवण्यापासून तर मनी ऑर्डर पाठवणे, अल्पबचत खाते उघडणे, स्टॅम्प आणि पोस्ट पाठवणे आणि ऑर्डर करणे अशी बरीच कामे करते. याकरता अधिक पोस्ट ऑफिस उघडण्याची आवश्यकता असल्याने त्याकरिता इंडिया पोस्टने फ्रॅंचाईजी योजना सुरू केली आहे. म्हणजे या अंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस उघडून पैसे मिळवू शकतात. देशातील असे अनेक दुर्गम भाग आहेत त्या ठिकाणी अजून देखील पोस्ट ऑफिस नाही.
नेमकी ही समस्या समोर ठेवून पोस्ट ऑफिस फ्रॅंचाईजी देण्यात येत आहेत. या योजनेचे स्वरूप पाहिले तर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दोन प्रकारच्या फ्रेंचाईजी देण्यात येतात. यामध्ये पहिली फ्रॅंचाईजी आउटलेट असते व दुसरी पोस्टल एजंट फ्रॅंचाईजी असते. या माध्यमातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारचे फ्रेंचाईजी घेऊ शकतात.
तसेच शहरी आणि ग्रामीण भागामध्ये घरोघरी टपालाची तिकिटे आणि स्टेशनरी पोहोचवणारे पोस्टल एजंट फ्रॅंचाईजी म्हणून ओळखले जातात. पोस्ट ऑफिस फ्रेंचाईजी योजनेच्या माध्यमातून कुणालाही अगदी अल्प रक्कम जमा करून आणि मूलभूत प्रक्रिया पार पाडून पोस्ट ऑफिस उघडता येते. हे एक यशस्वी बिझनेस मॉडेल असून चांगले उत्पन्नाचे साधन देखील आहे.
पोस्ट ऑफिस फ्रॅंचाईजी कशी घेता येते?
तुम्हाला देखील फ्रॅंचाईजी घ्यायची असेल तर त्याकरिता वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य पोस्ट खात्यामध्ये नोकरीला किंवा सेवेत नसावा. तसेच ज्या व्यक्तीला फ्रेंचाईजी घ्यायचे आहे तो आठवी पास असणे गरजेचे आहे.
याकरिता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो व फ्रेंचाईजी साठी अर्ज करणे गरजेचे असते. जेव्हा तुमची निवड केली जाते तेव्हा तुम्हाला इंडिया पोस्ट सोबत एक सामंजस्य करार देखील करावा लागतो. यामध्ये जर तुम्हाला फ्रॅंचाईजी आउटलेट घ्यायची असेल तर तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक लागते.
परंतु पोस्टल एजंट साठी थोडी जास्त गुंतवणूक करणे गरजेचे असते. कारण यामध्ये स्टेशनरी वस्तू खरेदी कराव्या लागतात व याकरिता जास्त भांडवल लागते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस उघडण्याकरिता तुमच्याकडे कमीत कमी दोनशे चौरस फुटांचे ऑफिस एरिया असणे गरजेचे आहे.
पोस्ट ऑफिस फ्रॅंचाईजी उघडण्यासाठी सुरक्षारक्कम किती ठेवावे लागते?
पोस्ट ऑफिस फ्रॅंचाईजी उघडायची असेल तर कमीत कमी सुरक्षा रक्कम म्हणून पाच हजार रुपये ठेवावे लागतात. तुम्हाला फ्रॅंचाईजी करिता अर्ज करावा लागतो व त्याकरिता तुम्ही अधिकृत लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.
या व्यवसायामध्ये कशी होते आर्थिक कमाई?
पोस्ट ऑफिस फ्रॅंचायजी व्यवसायामध्ये होणाऱ्या आर्थिक प्राप्ती बद्दल बोलायचे झाले तर याकरिता ऑर्डर साठी तीन ते पाच रुपये आणि स्पीड पोस्ट करिता पाच रुपये, स्टेशनरी वर पाच टक्के अशा पद्धतीचे कमिशन मिळते. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या ज्या काही पोस्ट ऑफिसच्या सेवा आहेत त्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कमिशन मिळत असते.