आर्थिक

Profitable Business Idea: नोकरी न करता करा ‘हा’ व्यवसाय! महिन्याला कमवू शकतात 70 हजार

Profitable Business Idea:- पैसा जीवन जगण्यासाठी आवश्यक असून प्रत्येक जण नोकरी किंवा एखादा व्यवसाय करून जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल व आपण श्रीमंत कसे होऊ? या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. परंतु बऱ्याचदा उत्तम शिक्षण घेऊन देखील नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे नोकरी मिळत नाही व त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीची समस्या उद्भवते.

त्यामुळे काहीतरी व्यवसाय करायची कल्पना मनामध्ये येते. परंतु व्यवसाय करायला देखील तुम्हाला लागणारी गुंतवणूक आणि व्यवसाय करावा कोणता? इत्यादी अनेक प्रश्न मनात येतात. व्यवसायाची निवड केली तरी तो व्यवसाय बाजारपेठेमध्ये व्यवस्थित रन होईल का म्हणजे चालेल का हे देखील पाहिले जाते.

व्यवसायांची जर आपण यादी पाहिली तर अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांची मोठी यादी तयार होईल. परंतु यातून कोणता व्यवसाय तुमचा फायद्याचा राहील या सोबतच अनेक गोष्टींचा विचार करून व्यवसायाची निवड करणे देखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या लेखात आपण असा एक व्यवसाय पाहणार आहोत जो तुम्हाला एका वर्षामध्ये खूप चांगला पैसा मिळवून देऊ शकतो व या माध्यमातून तुम्ही शाश्वत आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करू शकतात.

 काय आहे जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट?

हल्ली जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर अनेक औषधी आणि हर्बल उत्पादनांचे मागणी खूप वेगाने वाढत असून शेतीमध्ये देखील आता अनेक रासायनिक कीटकनाशकांऐवजी अनेक वनौषधी पासून तयार केलेल्या कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. अशा सगळ्या स्थितीमध्ये जर तुम्ही जर्दाळू तेलचे उत्पादन सुरू केले तर तुम्ही या माध्यमातून भरपूर कमी करू शकतात.

म्हणजे या करता तुम्हाला जरदाळू तेल प्रक्रिया युनिट उभारावा लागेल. तुम्हाला माहित असेलच की जरदाळूच्या बियांपासून हे तेल बनवले जाते. काही देशांमध्ये स्वयंपाकात देखील या तेलाचा वापर होतो. परंतु जर सौंदर्य प्रसाधन उद्योग म्हणजेच कॉस्मेटिक उत्पादने तयार करण्यासाठी या तेलाला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

तसेच यामध्ये विटामिन ई मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे देखील त्याची मागणी वर्षभर राहते. जरदाळू तेलामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असल्यामुळे देखील ते आरोग्यासाठी चांगले मानले जाते. बरेच लोकं मसाज करण्याकरिता देखील या तेलाचा वापर करतात व केसांच्या चांगल्या आरोग्याकरिता देखील हे तेल चांगले आहे.

 हा उद्योग सुरू करण्यासाठी किती खर्च येईल?

तुम्हाला देखील जरदाळू तेलाचा युनिट उभारायचा असेल तर यासाठी किती खर्च येईल याची संपूर्ण माहिती खादी व ग्रामोद्योग आयोगाने दिली आहे. यांच्या माहितीनुसार जर्दाळू तेल प्रक्रिया युनिट उभारण्याकरता तुम्हाला दहा लाख 79 हजार रुपये लागतील. याकरिता तुम्हाला कर्जाची मदत देखील मिळू शकते.

तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागेची आवश्यकता भासेल. जर तुमच्याकडे जागा नसेल तर ती तुम्हाला भाड्याने घ्यावी लागेल. यामध्ये तुम्हाला प्लांट आणि यंत्रसामग्रीकरिता पाच लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. तसेच व्यवसाय सुरू झाल्यानंतर खेळते भांडवल म्हणून अंदाजे चार लाख 29 हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि फर्निचर व इतर आवश्यक बाबींकरिता एक लाख 50 हजार रुपये लागतील.

 या उद्योगातून तुम्ही किती नफा मिळवू शकता?

जर्दाळू तेल प्रक्रिया युनिटच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीला प्रत्येक महिन्याला 60 ते 70 हजार रुपये सहज कमवू शकतात. परंतु कालांतराने तुम्ही तुमच्या व्यवसाय वाढीच्या प्लॅनिंग बनवून व्यवसायामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत जाल तसतसं तुमचे उत्पन्न वाढत जाईल. आज या व्यवसायातून अनेक जण एका वर्षात कोट्यावधी रुपयांची देखील कमी करत आहेत.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts