आर्थिक

Profitable Business Idea: मसाला उद्योग सुरू करा आणि महिन्याला कमवा 30 ते 40 हजार! पण कसे? वाचा सविस्तर

Profitable Business Idea:- अनेकांच्या मनामध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार येतो. परंतु व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्यासाठी लागणारा पैसा आणि त्या व्यवसायाला असलेली मागणी या गोष्टी साधारणपणे विचारात घेतल्या जातात. यामध्ये कोणता व्यवसाय करावा याची निश्चिती झाल्यानंतर पैशांचे तजवीज देखील केली जाते परंतु व्यवसाय सुरू झाल्यानंतर मात्र तो व्यवसाय वाढवणे व सतत नफ्यात चालवणे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या असते ते म्हणजे तुम्ही तयार करत असलेल्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे का आणि आहे तर ती किती प्रमाणात आहे? या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. साधारणपणे जर दैनंदिन वापरातल्या वस्तू किंवा खाद्यपदार्थांच्या संबंधित असलेले व्यवसाय जर उभारले व अशा व्यवसायांमधून तयार होत असलेल्या उत्पादनाचा दर्जा हा उत्तम असला तर नक्कीच उत्पादनांच्या बाबतीत बाजारपेठेत कितीही स्पर्धा राहिली तरी तुमचे उत्पादन स्पर्धेत टिकून राहते व तुम्हाला बाजारपेठ हमखास मिळते.

याच मुद्द्याला धरून जर आपण मसाला उद्योगा विषयी विचार केला तर बाजारामध्ये सध्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या मसाल्या बनवतात. परंतु जर ग्राहकांचा विचार केला तर दर्जेदार आणि चविष्ट अशा मसाल्यांना मागणी दिसून येते. त्यामुळे जर तुम्ही या उद्योगाचा विचार केला व चांगला दर्जेदार मसाला निर्मिती केली तर नक्कीच या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये आरामात कमवू शकतात. याचा अनुषंगाने आपण या लेखात या उद्योगा विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

 मसाला उद्योगाचे साधारणपणे सुरुवातीचे स्वरूप

समजा तुम्हाला मसाले बनवायचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही मसाले बनवण्याचा युनिट उभारू शकतात व तुमचा उद्योग देखील उभारू शकता. या व्यवसायामध्ये तसे पाहायला गेले तर खर्च तसा खूप कमी आहे व खर्चाच्या मानाने नफा हा जास्त प्रमाणात मिळतो. परंतु सुरुवातीला तुमच्याकडे जेवढे भांडवल आहेत त्यातूनच तुम्ही हा व्यवसाय सुरू करणे महत्त्वाचे आहे. कारण भारतामध्ये मसाल्यांना मागणी प्रचंड प्रमाणात असल्यामुळे हळूहळू या व्यवसायात वाढ करणे गरजेचे आहे.

 मसाले उद्योगासाठी लागणारी आवश्यक यंत्रसामग्री

1- क्लीनर मसाला मशीन मसाला बनवण्यासाठी देखील कच्चामाल लागतो व या कच्चामालामध्ये लहान लहान खडे किंवा धूळ असते. अशी धूळ किंवा लहान खडे दूर करण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरते.

2- ड्रायर मसाला मशीन बऱ्याचदा कच्चामाल हा थोडासा ओला असतो किंवा त्यामध्ये मोईश्चर असते. त्यामुळे हा माल वाळवण्याकरिता ड्रायर मशीन चा वापर केला जातो.

3- ग्राइंडर मशीन मसाला दळण्यासाठी या ग्राइंडर मशीन चा वापर केला जातो.

4- पावर ग्रेडर मशीन तुम्ही जे मसाले बनवतात ते मसाले फिल्टर करण्याकरिता या मशीनचा वापर होतो.

5- पाऊच पॅकिंग मशीन या मशीनच्या माध्यमातून तुम्ही जो काही मसाला तयार केलेला आहे तो पाऊच किंवा पुड्यांमध्ये या मशीनच्या सहाय्याने पॅक करता येतो.

 या व्यवसायाची नोंदणी करावी लागते का?

मसाला उद्योगाची नोंदणी करणे गरजेचे असते व ती तुम्हाला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकीकरण यांच्याकडे करावी लागते व त्यांच्याकडून फूड लायसन्स घ्यावे लागते. त्यानंतर तुम्हाला उद्योग आधार देखील नोंदणी करावी लागते व व्यापार परवाना काढावा लागतो.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे बीआयएस प्रमाणपत्र परवाना देखील लागतो. तसेच तुमच्या कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडणे गरजेचे असते व कंपनीच्याच नावाने पॅन कार्ड देखील काढावे लागते. हे सर्व तुमच्याकडे असल्यानंतर तुम्ही सहजपणे तुमच्या उद्योगाची नोंदणी करू शकता व मसाला व्यवसाय सुरू करू शकता.

 किती जागा लागेल?

मसाला व्यवसाय सुरू करण्याकरिता कमीत कमी 200 ते 300 चौरस मीटर इतकी जागेची आवश्यकता असते.

 मसाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?

भांडवलाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मसाला व्यवसाय उभा करण्याकरिता तुम्हाला तुमच्या युनिटनुसार खर्च येतो. कमीत कमी तुमच्याजवळ 50 ते 60 हजार रुपये असले तरी तुम्ही हा व्यवसाय आरामात चालू करू शकता.

 मसाला व्यवसायातून किती आर्थिक उत्पन्न मिळू शकते?

तुम्ही जर 50 ते 60 हजार रुपये गुंतवणूक करून मसाला उद्योग सुरू केला तरी तुम्ही त्याच्या माध्यमातून महिन्याला तीस हजार ते 40 हजार रुपये कमवू शकतात. थोड्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर एक लाख रुपये महिना देखील कमावणे शक्य आहे.

 या व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे?

कुठल्याही व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी किंवा वाढीसाठी त्या व्यवसायाची मार्केटिंग खूप महत्त्वाचे असते. तसेच मसाला व्यवसायाचे मार्केटिंग करण्याकरिता तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकतात व फेसबुक तसेच इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुमच्या परिसरातील दुकानदारांशी संपर्क करून देखील तुमच्या व्यवसायाची विक्री तुम्ही वाढवू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts