आर्थिक

FD Interest Rate : जेष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर गुंतवणूक योजना; बघा ‘या’ बँकांचे FD दर…

FD Interest Rate : आज प्रत्येक व्यक्तीला गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो, जेणेकरून त्या व्यक्तीला भविष्यातील गरजा भागवता येतील. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय  उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. अशातच जर तुम्हाला बाजार जोखीम नको असेल तर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे जिथे तुमचे पैसे अगदी सुरक्षित राहतील आणि तुम्हाला हमी परतावा देखील मिळेल.

सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये एफडी हा प्रथम पर्याय मानला जातो. कारण त्यात बाजार जोखीम नाही. याशिवाय, निश्चित व्याजदराने निर्धारित वेळेत परतावा देखील मिळतो. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला आशा बँकांच्या एफडीबद्दल सांगणार आहोत, जिथे ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.

‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत

पंजाब नॅशनल बँक

देशातील सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँक देखील जेष्ठ नागरिकांना उत्तम व्याजदर ऑफर करत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के परतावा देत आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीवर तीन वर्षांनंतर 1.25 लाख रुपये परतावा मिळेल.

बँक ऑफ बडोदा

ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के दराने व्याज देते. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर येथे तीन वर्षांत 1.26 लाख रुपये मिळतील.

ICICI, HDFC बँक

ICICI आणि HDFC बँक देखील तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देतात. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला कालावधी संपल्यानंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

Axis Bank

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.६० टक्के दराने व्याज देत आहे. तीन वर्षांसाठी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक येथे 1.25 लाख होईल. जर तुम्ही उत्तम परताव्याची गुंतवणूक शोधत असाल तर या बँकेची एफडी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय.

Renuka Pawar

Recent Posts