Public Provident Fund : सरकारद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जात आहेत. यापैकी एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे व्यवस्थापित केली जाते. बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ही योजना उत्तम आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजने अंतर्गत सध्या ७.१ टक्के व्याज मिळत आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही अगदी करोडपती देखील होऊ शकता. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग…
पीपीएफ योजना काय आहे?
तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेत तुमचे खाते उघडू शकता. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे. गुंतवणूक तज्ञांचे म्हणणे आहे की पीपीएफ खात्यातील चक्रवाढ व्याजाचा फायदा तुम्हाला करोडपती बनवू शकतो.
PPF योजना बनवू शकते करोडपती
जर कोणी आपल्या PPF खात्यात दरवर्षी 1.50 लाख रुपये गुंतवले तर तो दरमहा 8333 रुपये गुंतवू शकतो. 25 वर्षांच्या गुंतवणुकीवर, 1,03,08,015 रुपये किंवा त्यापुढील रक्कम PPF खात्यात जमा केली जाईल. या कालावधीत तुम्ही अंदाजे 37,50,000 ची गुंतवणूक कराल आणि त्यावर तुम्हाला 65,58,015 चे व्याज मिळेल. पीपीएफ योजना तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत कर लाभाचा लाभ देखील देते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.