आर्थिक

Public Provident Fund : छोटी गुंतवणूक करूनही बनू शकता करोडपती, जाणून घ्या कसे?

Public Provident Fund Account : गुंतवणुकीसाठी सध्या मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशातच तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय घेऊन आलो आहोत. या योजनेत कमी गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा देखील कमावू शकता.

आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) लहान बचत असलेल्या लोकांसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सध्या सरकार यावर 7.1 टक्के दराने व्याज देत आहे. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणताही भारतीय या योजनेप्रमाणे आपले पीपीएफ खाते (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खाते) फक्त 100 रुपयांमध्ये उघडू शकतो. यात वार्षिक किमान 500 रुपये जमा करण्याची तरतूद आहे.

लक्षात घ्या पीपीएफ खात्यात वार्षिक किमान 500 रुपये जमा करणे बंधनकारक आहे. यामध्ये एक व्यक्ती एका वर्षात दीड (1.5) लाख रुपये जमा करू शकते. त्याचा लॉक इन पीरियड 15 वर्षांचा आहे. तुम्ही ते कोणत्याही बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही जाऊन उघडू शकता. येथे तुम्हाला पीपीएफ खात्याची सुविधा मिळते.

तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने त्यात योग्य पद्धतीने पैसे जमा केले तर त्याला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. पीपीएफच्या नियमांनुसार, जर एखाद्याने महिन्याच्या सुरुवातीच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा केले तर त्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते.

यामध्ये पीपीएफ मॅच्युरिटी रक्कम आणि त्यातील गुंतवणूक या दोन्हींवर व्याज दिले जाते. याशिवाय आयकरातही सूट मिळते. जर कोणत्याही व्यक्तीने योग्य योजनेसह पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तो सहजपणे करोडपती होऊ शकतो.

समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 30 व्या वर्षी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खाते उघडले आणि 30 वर्षांसाठी वार्षिक 1.50 लाख रुपये गुंतवले, तर सध्याच्या PPF व्याजदरानुसार, त्याला 30 वर्षात 1.5 करोडो रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 30 वर्षांमध्ये (1.5×30) 45 लाख रुपये जमा केले तर त्याला व्याज म्हणून सुमारे 1 कोटी रुपये मिळतात. म्हणजेच मॅच्युरिटीवर त्याला दीड कोटींहून अधिक रक्कम मिळू शकते.

Sonali Shelar

Published by
Sonali Shelar

Recent Posts