Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. जर तुम्ही ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या काही खातेधारकांचे अकाउंट येत्या काही दिवसांनी बंद होणार आहे.
खरे तर पंजाब नॅशनल बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँका आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक आहे.
यानंतर नंबर लागतो तो पंजाब नॅशनल बँकेचा. या बँकेतील खातेधारकांची संख्या ही 19 कोटीहून अधिक आहे. मात्र आता याच कोट्यावधी बँक ग्राहकांपैकी काही ग्राहकांचे बँक अकाउंट बंद केले जाणार आहे. पंजाब नॅशनल बँकेतील जवळपास तीन लाख खातेधारकांचे बँक आगामी काळात बंद होणार आहे.
जे बँक ग्राहक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांचे खाते आगामी काळात बंद होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देशातील सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना केवायसी पूर्ण करण्यास सांगत आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या ग्राहकांना आरबीआयच्या निर्देशांचे पालन करत आपल्या ग्राहकांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. मात्र अजूनही पंजाब नॅशनल बँकेच्या लाखो ग्राहकांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
म्हणून आता केवायसी पूर्ण न केलेल्या खातेधारकांचे अकाउंट बंद होणार आहे. अशा ग्राहकांचे बँक अकाउंट 12 ऑगस्ट 2024 पासून बंद केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती नुकतीच समोर आली आहे.
म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेत अकाउंट असणाऱ्या ज्या ग्राहकांनी अजून केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांना लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. बँकेने दिलेल्या मुदतीत म्हणजेच 12 ऑगस्टपर्यंत जे ग्राहक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांचे अकाउंट बंद होणार आहे.
आतापर्यंत बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अजूनही तीन लाख 25 हजार असे ग्राहक आहेत ज्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या संबंधित ग्राहकांच्या खात्यावर टांगती तलवार आहे.
बँकेने दिलेल्या मुदतीत जर ग्राहकांनी ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीये. म्हणून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत बँकेने दिलेल्या मुदतीत खातेधारकांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.