Punjab National Bank : नवीन वर्षात PNB गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी खास संधी असणार आहे. PNB बँकेने नुकतेच आपले एफडी वरील व्याजदर वाढवले आहेत, अशास्थितीत तुम्ही येथे गुंतवणूक करून जबरदस्त परतावा मिळवू शकता.
एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. सुरक्षेसह पंजाब बँक वाढीव व्याजदर देखील देत आहे. PNB ने नुकतेच आपल्या FD योजनेतील व्याजदरात वाढ केली आहे. अशा स्थितीत ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त लाभ मिळणार आहे.
PNB सध्या 400 दिवसांची FD योजना चालवत आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही 400 दिवसांच्या FD योजनेत 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला या रकमेच्या किती परतावा मिळेल. चला जाणून घेऊया…
बँकेने नुकतेच 400 दिवसांच्या विशेष FD योजनेचे व्याजदर वाढवले आहेत. या व्याजदरात 0.45 टक्के वाढ करण्यात आली आहे. वाढीव व्याजदरानंतर ते 7.25 टक्के करण्यात आले आहे. वाढीव व्याजदरासह पीएनबीची ही सर्वाधिक व्याज देणारी बँक आहे.
या व्याजदरासह तुम्ही PNB च्या FD स्कीममध्ये 400 दिवसांसाठी 1 लाख रुपये गुंतवत असाल, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 1 लाख 7 हजार 972 रुपये मिळतील. या मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण ७ हजार ९७२ रुपये फक्त व्याजातून मिळतील.
PNB च्या 400 दिवसांच्या FD योजनेबद्दल बोलताना, बँक या काळात वृद्धांना जास्तीत जास्त लाभ देत आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना त्याच कालावधीत 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे.