Punjab National Bank : सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. जर तुम्ही सुरक्षित आणि हमी परतावा असणारी गुंतवणूक योजना शोधत असाल तर एफडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल, देशात अशा अनेक बँका आहेत, ज्या सध्या एफडीवर भरगोस व्याज देत आहेत, त्यातलीच एक बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक. ही बँक सध्या एफडीवर इतरांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत आहे.
अलीकडेच PNB ने आपल्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. नवे व्याजदर 8 जानेवारीपासून लागू झाले आहेत. या एफडीवरील व्याज पंजाब नॅशनल बँकेने 80bps म्हणजेच 0.80% ने वाढवले आहेत. वाढलेल्या व्याजदरामुळे आता सर्वसामान्य लोक, ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना या FD वर वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत आता या FD वर 7.85% पर्यंत व्याज आकारले जाऊ शकते. 1 लाख, 2 लाख आणि 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सामान्य लोकांपासून ते अति ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण किती नफा मिळवू शकतो जाणून घेऊया…
एफडीचे व्याजदर :-
PNB च्या या मुदत ठेव योजनेत, सामान्य लोकांना 7.05% दराने व्याज मिळत आहे, जे पूर्वी 6.25% होते, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज मिळेल जे पूर्वी 6.75% होते. सुपर ज्येष्ठ नागरिक यावर सर्वोत्तम व्याज घेऊ शकतात. आता त्यांना 7.85% दराने व्याज मिळेल जे पूर्वी 7.05% होते.
1 लाखाच्या गुंतवणुकीवर किती नफा :-
सामान्य लोक: व्याज दर 7.05%, नफा 6,362 = मॅच्युरिटी नंतरची रक्कम 1,06,362 रुपये
ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.55%, नफा 6,405 रुपये = मुदतपूर्तीनंतरची रक्कम 1,06,405 रुपये
सुपर ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.85%, नफा रु 6,665 = मुदतपूर्तीनंतरची रक्कम 1,06,665
2 लाखांच्या गुंतवणुकीवर किती नफा :-
सामान्य लोक: व्याज दर 7.05%, नफा 12,723 = मुदतपूर्तीनंतरची रक्कम 1,12,723 रुपये
ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.55%, नफा 12,810 = मुदतपूर्तीनंतरची रक्कम रु. 1,12,810 रुपये
सुपर ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.85% नफा 13,330 = परिपक्वता नंतरची रक्कम रु. 1,13,330 रुपये
5 लाखांच्या गुंतवणुकीवर किती नफा :-
सामान्य लोक: व्याज दर 7.05%, नफा 31,808 = मॅच्युरिटी नंतरची रक्कम 1,31,808 रुपये
ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.55%, नफा 32,024 = मुदतपूर्तीनंतरची रक्कम 1,32,024 रुपये
सुपर ज्येष्ठ नागरिक: व्याज दर 7.85%, नफा 33,326 = मुदतपूर्तीनंतरची रक्कम 1,33,326 रुपये