आर्थिक

Tax Benefit On Home Loan: होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करा आणि सरकारकडून कर सवलत मिळवा! अशा पद्धतीने मिळवा होम लोनवर कर लाभ

Tax Benefit On Home Loan:- प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे हे स्वप्न असतं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्या वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्याने बरेच जण होम लोनचा आधार घेतात.

सरकारच्या माध्यमातून देखील लोकांना स्वतःचे घर घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यात येत आहे. होम लोन घेतल्यामुळे आपल्या घराचे स्वप्न तर पूर्ण होते परंतु आपल्याला ते होमलोन दीर्घ कालावधी करिता परतफेड करावे लागते. परंतु बरेच व्यक्ती अशी आहेत

की ते होम लोन घेतात परंतु त्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जी कर सवलत अशा व्यक्तींना दिली जाते.त्याबद्दल मात्र काहीही माहिती नसते. त्यामुळे या लेखामध्ये आपण होम लोन घेतल्यावर किती पर्यंत आपल्याला कर सवलत मिळू शकते व हा लाभ कसा घ्यावा? याबद्दलची माहिती घेऊ.

होमलोनवर किती मिळते कर सवलत?

जेव्हा आपण होमलोन घेत असतो तेव्हा आपल्याला ते कर्ज परतफेड करताना त्यावर आपल्याला व्याज द्यावे लागते. परंतु या बाबतीत जर आपण आयकर कायदा पाहिला तर जेव्हा आपण गृहकर्जावर व्याज भरतो तेव्हा ते व्याज भरल्यानंतर आयकर कायदा अंतर्गत कलम 24, कलम 80सी आणि कलम 80ई अंतर्गत कर सुटीचा लाभ मिळतो.

यातील कलम 24 पाहिले तर या माध्यमातून तुम्ही तुमच्या होमलोनच्या जागेवर एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर सुट मिळवू शकतात. तर कलम 80सी अंतर्गत गृह कर्जावरील व्याजावर कमाल दीड लाख रुपयापर्यंत सूट मिळते.

यासोबतच जर आपण आयकर कायदा कलम 80ई पाहिला तर त्यानुसार आपल्याला गृह कर्जाच्या व्याजाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये पर्यंत कर सुट मिळते.

 अशा पद्धतीने मिळवा होम लोनवर कर सवलतीचा लाभ

आपण वर पाहिल्याप्रमाणे कलम 24 च्या माध्यमातून एका आर्थिक वर्षांमध्ये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजावर दोन लाख रुपयापर्यंत सूट मिळते. त्यामुळे कर्जदारावरील कराचा बोजा कमी होतो. समजा करदात्याने जर गृह कर्जाचे मूळ रक्कम बँकेत परत केली तरी देखील त्याला कर लाभ दिला जातो.

याकरिता करदाता हा प्राप्तिकर कायद्याचे कलम 80 सी अंतर्गत कमाल दीड लाख रुपयांपर्यंतचा दावा याकरिता करू शकतो.समजा तुम्ही यावर्षी घराची खरेदी केली आहे तर तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्कावरील कर लाभ घेऊ शकतात व हा तुम्हाला आयकर कायदा कलम 80सी अंतर्गत मिळत असतो.

या पद्धतीने देखील तुम्ही कमाल दीड लाख रुपयापर्यंत कर सवलत घेऊ शकतात. विशेष म्हणजे संयुक्त कर्ज घेतले असेल तरी देखील करात सूट मिळते व या प्रकारात देखील व्याजावर दोन लाख रुपये आणि मूळ रकमेवर दीड लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts