Become Rich Tips:- आपण जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत करून चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे हे आर्थिक समृद्धी आणि भविष्यामध्ये श्रीमंत होण्यासाठीच एक उत्तम मार्ग असतो.तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा तुम्ही कमावलेल्या पैशाची बचत किती व कशा प्रकारे करतात व त्या बचतीची गुंतवणूक कुठे करतात याला खूप महत्त्व असते.
सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर प्रत्येक जणांचा खर्च हा जास्त होताना आपल्याला दिसून येतो. कधी कधी तर महिन्याला पन्नास हजार रुपये पगार असलेल्या व्यक्तींची देखील बचत शून्य स्वरूपामध्ये असते. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये बचत करून गुंतवणुकीचे योग्य पर्याय वापरून चांगला पैसा जमा करणे हे खूप गरजेचे आहे.
त्यामुळे तुम्हाला नियमित बचत व सातत्याने गुंतवणुकीची सवय अंगी बाणवणे खूप गरजेचे आहे. बऱ्याच जणांची लखपती किंवा करोडपती होण्याची इच्छा असते याकरिता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते असा समज असतो.
परंतु असे काही नाही. छोटीशी बचत चांगल्या ठिकाणी गुंतवत असाल तरी देखील तुम्ही काही कालावधीनंतर खूप मोठ्या प्रमाणावर पैसा जमा करू शकतात. याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करेल असा 15-30-20 चा फार्मूला पाहणार आहोत.
काय आहे 15-30-20 चा फॉर्म्युला?
महागाईच्या कालावधीमध्ये तुम्ही हा फार्मूला वापरून तुमची बचत वाढवू शकतात. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने बचत करायचे असेल व तुमचा बॅलन्स वाढवायचा असेल तर हा फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. या फार्मूला मध्ये तुमचे जे काही उत्पन्न आहे ते तीन भागामध्ये विभागावे लागते. तुम्ही नोकरीला असाल किंवा एखादा व्यवसाय करत असाल तरी देखील तुम्ही संपूर्ण महिन्याचे जे काही उत्पन्न आहे ते या फॉर्मुल्याचा वापर करून त्या फार्मूलानुसार विभागू शकतात.
हा फार्मूला पैसे वाचवण्यासाठीचा एक उत्तम असा मार्ग असून तुम्हाला आर्थिक दृष्ट्या खूप भक्कम बनवतो. यानुसार वाचलेला पैसा तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवून लवकर श्रीमंत होऊ शकतात. बऱ्याच लोकांना चांगला पगार किंवा त्यांचे महिन्याचे उत्पन्न चांगले असते. परंतु तरी देखील त्यांचा बँकेमध्ये ठणठणाट असतो.
अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा फार्मूला वापरला तर खूप मोठा फायदा होऊ शकतो. हा फॉर्मुला गरज, इच्छा आणि बचत यावर अवलंबून असून या तीन बाबींवर तुमच्या उत्पन्नाची विभागणी यामध्ये करावी लागते. म्हणजेच तुमचे जे काही उत्पन्न आहे त्यातील 50% रक्कम भाडे, किराणा माल वाहतूक यासारख्या गरजांसाठी असेल.
तुमच्या उत्पन्नातील 50 टक्के भाग तुम्ही यावरच खर्च करावा. बाहेर फिरायला जाणे, मनोरंजन आणि शॉपिंग सारख्या गरजांसाठी 30 टक्के रक्कम तुमच्या उत्पन्नातून काढून ठेवणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमच्या उत्पन्नातील 20 टक्के रक्कम भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांसाठी चांगल्या ठिकाणी गुंतवावी.
म्हणजेच तुम्हाला जे काही उत्पन्न असेल त्यानुसार तुम्ही जर अशा पद्धतीने खर्चाची विभागणी केली तर नक्कीच तुमचे 20 टक्के पैसे तुमच्या बचत आणि गुंतवणुकीसाठी वाचतात व यामध्ये सातत्य ठेवून तुम्ही लवकरात लवकर श्रीमंत होऊ शकतात.