ATM Care Tips:- बँकिंग प्रणाली किंवा बँकिंगशी निगडित असलेली कामे आता ऑनलाइन पद्धतीने झाल्यामुळे तसेच डिजिटल पेमेंटच्या पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली जात असल्यामुळे आता बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा इतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही.
तुम्हाला पैसे काढायचे असतील किंवा पैसे डिपॉझिट करायचे असतील तर बँकेत रांगेत उभे न राहता बरेच जण एटीएमचा वापर करून पैसे काढतात किंवा पैसे डिपॉझिट देखील करतात. परंतु त्याही पुढे जात यूपीआयचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे एटीएमचा वापर देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे.
परंतु आज देखील बरेच व्यक्ती एटीएम चा वापर करतात. परंतु यूपीआय सारख्या पेमेंटच्या बाबतीत जसे ऑनलाइन पद्धतीने फसवणूक होण्याची शक्यता असते.
अगदी त्याच पद्धतीने एटीएम मधून देखील तुमचे पैसे जाऊ शकतात किंवा तुमची फसवणूक होऊ शकते. एटीएममध्ये तुमची एक चूक तुम्हाला खूप मनस्ताप देऊ शकते. त्यामुळे एटीएम मध्ये कशा पद्धतीने तुमची फसवणूक होऊ शकते व त्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा? त्याबद्दलची माहिती बघू.
एटीएममध्ये कार्ड अडकल्यानंतर कस्टमर केअरला कॉल करण्याची चूक करू नका
आपण ऐकले असेल किंवा वाचले असेल की एटीएम मध्ये जेव्हा आपण पैसे काढायला जातो तेव्हा एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकते. त्यावेळी आपल्याला काय करावे हे सुचत नाही. अशावेळी आपण या ठिकाणी दिलेल्या कस्टमर केअर नंबर वर कॉल करतो. परंतु इथेच आपण एक मोठी चूक करत असतो.
कारण बऱ्याचदा तुमचे कार्ड मशीनमध्ये अडकले नसून ते फसवणूक करणारेच बहुतांशी अडकवत असतात. असे लोक कार्ड कॅरिंग पोर्टमध्ये दुसरे मशीन बसवतात आणि नंतर कस्टमर केअर नंबर म्हणून त्यांचाच नंबर पेस्ट केल्यानंतर निघून जातात. जेव्हा तुम्ही तुमचे कार्ड अडकल्यानंतर त्या नंबर वर फोन करतात तेव्हा तुम्ही त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे फसतात.
त्यामुळे त्या संबंधित नंबर वर कॉल करण्याअगोदर फोन नंबर कोणत्या पद्धतीने लिहिला आहे हे तपासणे गरजेचे आहे. एखाद्या साधारण म्हणजेच कोणत्याही कॉमन पेपरवर नंबर लिहून तो पेस्ट केला असेल तर त्यावर कॉल करण्याची चूक करू नका.
एटीएम मशीनची तपासणी करा
जेव्हा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढायला जाल तेव्हा आत गेल्यानंतर व्यवस्थित त्या ठिकाणचे निरीक्षण करा व काही छुपे कॅमेरे त्या ठिकाणी आहेत का याची खात्री करा. एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉटची तपासणी देखील गरजेचे आहे.
कारण बऱ्याचदा फसवणूक करणारे कार्ड स्लॉटच्या सभोवती कार्ड रीडर चिप बसवतात व या माध्यमातून तुमचा एटीएम कार्डचा संपूर्ण पिन कोड पासून तर डेटा ऑटोमॅटिक त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणजेच चोरला जातो.
पिन टाका परंतु काळजी घ्या
कारण तुमच्या बँक खात्यामध्ये जर फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश करायचा असेल तर तुमचा एटीएम पिन त्यांना माहीत असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही एटीएममध्ये पिन अतिशय काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जातात त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती नसावी.
जर एटीएममध्ये गेल्यावर तिथे कोणी असेल तर त्याला सरळ बाहेर जाण्यास सांगावे. तसेच जेव्हा तुम्ही पिन टाईप कराल तेव्हा एटीएम मशीनचे कीबोर्ड हाताने झाकून ठेवणे आणि शक्य तितक्या मशीनच्या जवळ उभे राहणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्ही जो काही तीन टाकाल तो इतरांना दिसणार नाही.
तसेच एटीएममध्ये कुठल्याही ओळखत नसलेल्या व्यक्तीची मदत घेणे टाळा. तुम्हाला पैसे काढायला काही समस्या येत असेल व वेळ लागत असेल तरी देखील ठीक आहे परंतु एटीएम जवळ कोणाला येऊ देऊ नका.