आर्थिक

Home Loan : गृहकर्ज घेताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, भविष्यात येणार नाहीत अडचणी…

Home Loan : आजच्या काळात घर घेणे महागले आहे. घराच्या वाढत्या किंमती पाहता अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण बँक तुम्हाला तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात, बँक तुम्हाला स्वतःचे घर घेणयासाठी गृहकर्ज पुरवते, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे तुम्हाला हवे ते तुमच्या स्वप्नातले घर खरेदी करू शकता.

पण गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

सध्या अनेक बँका अतिशय माफक दरात गृहकर्ज सुविधा देत आहेत. आरबीआयने वाढवलेल्या रेपो दरानुसार गेल्या 6 महिन्यांत गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत. गृहकर्ज घेण्यापूर्वी, काही गोष्टी चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यास तुम्हाला भविष्यात EMI भरण्याचा त्रास होणार नाही.

गृह कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे. ज्या अंतर्गत तुम्ही तुमची मालमत्ता गहाण ठेवून गृहकर्ज घेऊ शकता. गृहकर्जाचे दोन प्रकार आहेत. घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेता येते. तुम्हाला गृहकर्ज घ्यायचे असेल, तर गृहकर्ज घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचे आहे.

-गृहकर्ज घेण्यासाठी, सर्वप्रथम बँक तुमचा सिबिल स्कोअर तपासावा. जर तुमचा CIBIL स्कोर 750 च्या वर असेल तर तुम्ही कमी व्याजावर गृहकर्ज मिळवू शकता. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर नीट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तुमचा सिव्हिल स्कोर खराब असेल तर बँक तुम्हाला गृहकर्ज देण्यास नकार देऊ शकते.

-गृहकर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही शक्य तितक्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करावी जेणेकरून तुम्हाला परवडणाऱ्या व्याजदरात गृहकर्जाची सुविधा मिळू शकेल. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्ही कमी व्याजदर देणारी बँक निवडू शकता.

-होम लोन घेणयापूर्वी मालमत्तेत संबंधित काही समस्या तर नाहीत हे तपासून घेणे महत्वाचे आहे. यासंबंधित सर्व कायदेशीर बाबी क्लियर असल्या पाहिजेत अन्यथा तुम्हला गृहकर्ज घेताना अडचण येऊ शकते.

-होम लोन घेणयापूर्वी सर्व कागदपत्रे आधीच जमा करावीत. जेणेकरून तुम्हाला गृहकर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये.

-गृहकर्ज देताना सर्व बँका तुमच्या उत्पन्नाचा दाखला तपासतात. तुमचा उत्पन्नाचा पुरावा तयार करा जेणेकरून तुम्हाला गृहकर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही आणि सहज कर्ज मिळेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts