Retirement Plans : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक ही फार महत्वाची आहे. आता गुंतवणूक केली तर पुढचे आयुष्य आपण अगदी आरामात घालवू शकतो. अशातच बाजरात अनेक पेन्शन योजना आहेत, ज्यामधून आपल्यासाठी एक निवडणे फार कठीण आहे. म्हणूनच आम्ही नेहमी चांगल्या पेन्शन योजना तुमच्यासाठी घेऊन येतो जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य पेन्शन योजना निवडता येईल. आजही आम्ही अशाच काही लोकप्रिय पेन्शन योजना घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला भविष्यात श्रीमंत बनवतील. चला तर मग जाणून घेऊया या योजनांबद्दल…
पेन्शनद्वारे, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सुवर्ण वर्षांमध्ये आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळते. वृद्धापकाळात कोणतीही व्यक्ती नोकरी करू शकत नाही, म्हणून सेवानिवृत्तीचे आधीच नियोजन सुरु केले पाहिजे, जेणेकरून पुढील आयुष्य बसून काढता येईल. बाजारात विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. काही योजना 5 वर्षांच्या प्रीमियम पेमेंट टर्मसह येतात. याचा अर्थ 5 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो. यानंतर नियमित मुदतपूर्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळतो. अशाच काही पेन्शन योजना पुढीलप्रमाणे :-
SBI सरल पेन्शन योजना
ही योजना 5 ते 40 वर्षांच्या पॉलिसी मुदतीसह येते. पॉलिसी 40 ते 70 वर्षे वयोगटात परिपक्व होते. 18-65 वर्षे वयोगटातील व्यक्ती या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. पॉलिसीची मुदत सिंगल प्रीमियमसाठी किमान 5 वर्षे आणि नियमित प्रीमियमसाठी 10 वर्षे आहे. यामध्ये किमान मूळ विमा रक्कम २५ हजार रुपये आणि कमाल ५० लाख रुपये आहे.
टाटा एआयए मासिक उत्पन्न योजना
या पॉलिसी अंतर्गत 5, 8 आणि 12 वर्षांच्या प्रीमियम पेमेंट अटी आहेत. 5 वर्षांच्या प्रीमियम पेमेंट टर्मसाठी पॉलिसीची मुदत 5 वर्षे आहे. यासाठी उत्पन्नाची मुदत 10 वर्षे आहे. 5 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी प्रवेश वय किमान 13 वर्षे आणि कमाल 60 वर्षे आहे. प्रीमियमसाठी कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. यामध्ये दरवर्षी 36 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
मॅक्स लाइफ ऑनलाइफ बचत योजना
या योजनेंतर्गत, 70 वर्षांच्या परिपक्वतेसाठी 5 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. प्रीमियम मासिक, वार्षिक, सहामाही आणि अर्धवार्षिक मोडमध्ये भरला जाऊ शकतो. किमान विमा रक्कम 1,20,000 रुपये आहे. वर्षाला किमान 12,000 रुपये भरावे लागतील.