आर्थिक

Rule Changes From 1 June : अर्रर्र.. तुमच्या खिशावर येणार आर्थिक ताण! 1 जूनपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

Rule Changes From 1 June : मे महिना संपायला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. लवकरच जून महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाचे बदल केले जातात. याचा थेट सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक बजेटवर परिणाम होत असतो.

जून महिन्यातही काहीसे बदल केले जाणार आहेत. यात LPG-CNG पासून ते बँकांपर्यंत काही नियम बदलणार आहेत. इतकेच नाही तर इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे याचा खूप मोठा फटका सर्वसामान्यांना होताना दिसणार आहे.

एलपीजीच्या बदलणार किमती?

सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलत असतात. या किमती प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला निश्चित करण्यात येतात. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या तारखेला 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती. परंतु, 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. दरम्यान मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांपर्यंत कपात केली होती.

CNG-PNG च्या किमतीत होणार बदल?

हे लक्षात घ्या की एलपीजी सिलिंडरप्रमाणेच सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत असतात. दरम्यान पेट्रोलियम कंपन्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती बदलत असतात.

मागील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केली होती. तसेच, पहिल्या मे महिन्यात रोजी फारसा बदल झाला नाही. अशात आता सर्वसामान्यांच्या नजरा पुन्हा एकदा एक तारखेकडे लागल्या आहेत. या दरम्यान सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतो अशी त्यांना अपेक्षा आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत वाढ होणार

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1 जूनपासून देशात इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणे पूर्वीपेक्षा महाग होणार आहे. त्यामुळे १ जूननंतर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर विकत घ्यायला गेला तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. दरम्यान 21 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अवजड उद्योग मंत्रालयाकडून FAME-II अनुदानाची रक्कम सुधारित करण्यात आली आहे.

ती 10,000 रुपये प्रति kWh इतकी कमी केली आहे. तसेच पूर्वी ही रक्कम 15,000 रुपये प्रति किलोवॉट होती. त्यामुळे, बहुतेक इलेक्ट्रिक वाहने 25,000 ते 35,000 रुपयांपर्यंत महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोहीम

1 जूनपासून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे. या मोहिमेचे नाव ‘100 दिवस 100 पेमेंट्स’ असे ठेवले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना माहिती दिली आहे. या मोहिमेअंतर्गत 100 दिवसांत 100 हक्क नसलेल्या रकमेचा निपटारा करण्यात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts