Rule Of 72:- गुंतवणूक ही बाब भविष्यकालीन आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून तुम्ही जेही पैसे कमावतात त्या पैशातील काही भाग हा बचत करून चांगल्या योजनांमध्ये गुंतवणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला दहा किंवा पंधरा हजार जरी पगार असेल तरी त्यामधून तुम्ही प्रत्येक महिन्याला नियमितपणे एखाद्या चांगल्या योजनेमध्ये गुंतवणूक करत राहणे खूप गरजेचे आहे.
गुंतवणुकीच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे गुंतवणूक करण्याआधी व्यक्ती विचार करतो की आपण गुंतवत असलेले पैशांचा परतावा किती मिळेल किंवा एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपली गुंतवलेली रक्कम किती वर्षांनी दुप्पट होईल?तसेच गुंतवणुकीच्या बाबतीत जर पाहिले तर गुंतवणूक करून जर तुम्हाला चांगला परतावा
किंवा आर्थिक समृद्धी मिळवायची असेल तर तुम्हाला गुंतवणूक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते व त्यामध्ये सातत्य देखील ठेवावे लागते. त्यासोबतच तुम्हाला जर माहिती करून घ्यायचे असेल की तुम्ही गुंतवलेले पैसे किती दिवसांनी किंवा कधी दुप्पट होतील? तर त्याकरता रुल ऑफ 72 म्हणजेच 72 चा नियम फायद्याचा ठरतो. या आधारे तुम्ही तुमची गुंतवणूक किती किंवा कधी दुप्पट होईल? हे पटकन तुम्हाला समजू शकते.
काय आहे रुल ऑफ 72?
तुम्ही गुंतवत असलेले पैसे किती वर्षांनी किंवा कधी दुप्पट होतील हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर याकरिता तुम्हाला 72 चा हा नियम खूप मोठी मदत करतो. याकरिता तुम्हाला फक्त तुम्ही जी काही रक्कम गुंतवत आहात त्या गुंतवणुकीवर जे व्याज मिळते त्याला 72 ने भागावे लागते.
हा भाग दिल्यानंतर जे उत्तर येते ते म्हणजे तुमचे पैसे दुप्पट होण्याचे वर्ष किंवा कालावधी असतो. समजा तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये आठ टक्के दराने व्याज मिळत आहे व या व्याजाला जर तुम्ही 72 ने म्हणजेच आठला जर 72 ने भागले तर उत्तर नऊ येते. याचाच अर्थ तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर आठ टक्क्यांचे व्याज मिळत असेल तर नऊ वर्षांमध्ये तुमची रक्कम दुप्पट होईल.
गुंतवणुकीची रक्कम तिप्पट कधी होईल हे ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे रुल ऑफ 114
जर तुम्हाला तुम्ही गुंतवणूक केलेली रक्कम तिप्पट कधी होईल हे जाणून घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला 114 चा नियम खूप मोठी मदत करू शकतो.
यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजदराने भागावे लागते. समजा तुम्हाला एखाद्या योजनेत आठ टक्के दराने व्याज मिळत आहे. अशावेळी तुम्हाला 114 ला आठ ने भागावे लागेल व त्याचे उत्तर येईल 14.2 हे होय. याचा अर्थ असा होतो की तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे ती 14 वर्षांमध्ये तिप्पट होईल.