आर्थिक

Salary Hike Update: 2024 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ! वाचा ‘या’ संस्थेने काय वर्तवला अंदाज?

Salary Hike Update:- सध्या भारत हा अविकसित देशाकडून विकसित देशांच्या यादीमध्ये जाऊन पोहोचण्याच्या मार्गावर असून गेल्या काही वर्षापासून अर्थव्यवस्था विकासाच्या दृष्टिकोनातून भारताची घोडदौड कौतुकास्पद असल्याचे दिसून येते. जर आपण जागतिक आर्थिक मंदीचा कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील इतर देशांपेक्षा खूप वेगाने वाढताना दिसून येत आहे.

त्यामुळे या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम हा अनेक दृष्टिकोनातून बऱ्याच क्षेत्रांवर होताना दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीचा फायदा हा भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील होणार असून या 2024 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता कॉर्न फेरी या संस्थेकडून वर्तवण्यात आलेली आहे. नेमकी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होण्यामागील कोणती कारणे आहेत हे आपण या लेखात जाणून घेऊ.

 काय आहे कॉर्नफेरी या संस्थेचा अंदाज?

भारतीय कर्मचाऱ्यांना या 2024 या नवीन वर्षामध्ये तब्बल 9.7% पगार वाढ मिळण्याची शक्यता असून ही पगार वाढ आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात जास्त पगारवाढ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत कॉर्नफेरी या संस्थेने केलेल्या ताज्या  सर्वेक्षणानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 9.7% इतकी वाढ होणार असून गेल्या वर्षी मिळालेल्या 9.5% पगारवाढीपेक्षा ही वाढ जास्त असणार आहे.

 काय आहे कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी मागील कारण?

जर आपण यामागील कारणांचा शोध घेतला तर असे दिसून येते की जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था जागतिक तुलनेमध्ये इतर देशांपेक्षा खूप वेगाने वाढत असून त्यामुळे कंपन्या त्यांच्याकडे जे काही कर्मचारी आहेत त्यांना टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार असून याच कर्मचाऱ्यांवर जास्तीचा पैसा खर्च केला जाण्याची शक्यता आहे.

जर आपण या संस्थेचे सर्वेक्षण पाहिले तर त्यानुसार 2024 मध्ये भारतानंतर व्हिएतनाम या देशात 6.7 टक्के इतके पगार वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पगारवाढीच्या बाबतीत अशा पॅसिफिक प्रदेशांमध्ये व्हीयतनाम दुसऱ्या क्रमांकावर असेल तर 6.5% वाढीसह इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे.

 कॉर्न फेरीचे अध्यक्षांनी सांगितले यामागील कारणे

कॉर्नफेरीचे अध्यक्ष नवनीत सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना म्हटले की, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असून जागतिक मंदीच्या कालावधीमध्ये देखील भारताचा जीडीपी रेशो हा इतर देशांपेक्षा चांगला असेल व त्यामुळे भारतातील कंपन्या विकासाकरिता चांगल्या कर्मचाऱ्यांवर पैसे खर्च करतील.

तसेच या वर्षांमध्ये रसायने तसेच औद्योगिक वस्तू आणि वित्तीय सेवा  या विभागातील कंपन्या दहा टक्क्यांपर्यंत वेतनवाढ करू शकतील व ही वेतनवाढ सर्वाधिक असेल. त्या खालोखाल आयटी क्षेत्रातील कंपन्या 7.8 टक्के पगारवाढ करण्याची शक्यता असून ऑटोमोटिव्ह 9.7% तसेच बांधकाम क्षेत्र 9.6% आणि आरोग्य सेवा 9.5% अशाप्रकारे या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पगार वाढ होऊ शकते.

एवढेच नाही तर नवनीत सिंग यांनी म्हटले की, अनेक कंपन्या पुढील काही वर्षांकरिता प्लॅनिंग बनवत आहेत व त्यामुळे यावर्षी नवीन नोकऱ्या देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे व त्यामुळे करिअरचे मार्ग वाढण्याची देखील शक्यता आहे व त्यामुळे अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होऊ शकते.

एवढेच नाही तर यावर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट प्रोत्साहन मिळेल व कंपन्या चांगल्या लोकांना जोडून ठेवण्यासाठी देखील प्रयत्नशील असतील असे देखील त्यांनी म्हटले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts