Saving Account : बचत खात्याची सुविधा देशातील प्रत्येक बँक देते. प्रत्येक बँकेचे बचत खात्याशी संबंधितवेगवेगळे नियम आहेत. आज आम्ही तुम्हाला बचत खात्याशी संबंधित असाच एक नियम सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला भविष्यात बचत खाते उघडताना फायदा होईल. चला तर मग …
सध्या काही बँका बचत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल ग्राहकांकडून दंड आकारत आहेत. हा दंड टाळण्यासाठी तुमच्या बचत खात्यात किमान रक्कम असणे आवश्यक आहे. तुमच्या बचत खात्यातील सरासरी मासिक शिल्लक (AMB) बँकेने ठरवलेल्या रकमेपेक्षा कमी असल्यास, हा दंड तुमच्याकडून आकारला जातो.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक (ICICI), HDFC बँक (HDFC) आणि बँक ऑफ बडोदा त्यांच्या ग्राहकांकडून दंड म्हणून किती पैसे आकारात आहे, चला जाणून घेऊया.
आयसीआयसीआय बँक
तुमचे खाते ICICI बँकेत असल्यास, बँक तुमच्या खात्यातील किमान मासिक सरासरी शिल्लक (NMMAB) न ठेवल्याबद्दल दंड आकारते. तुमचे खाते मेट्रो, शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागात असल्यास, तर NMMAB च्या बाबतीत, बँकेकडून 100 रुपये आकारले जातात. याशिवाय, किमान सरासरी शिल्लक (MAB) मधील कपातीच्या पाच टक्के रक्कम देखील बँकेकडून वसूल केली जाते. जर तुमचे खाते ग्रामीण भागात असेल तर ग्राहकांच्या किमान सरासरी शिल्लक रकमेच्या पाच टक्के कपात केली जाते.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. समजा तुमच्या खात्यात किमान तीन हजार रुपये असणे SBI कडून बंधनकारक असेल, तर मेट्रो शहरांतील बँकेच्या नियमांनुसार, तुमच्या बचत खात्यात 50 टक्के म्हणजे 1500 रुपये शिल्लक असल्यास, त्यामुळे SBI तुम्हाला यावर १० रुपये अतिरिक्त GST आकारते. जर तुमच्या खात्यातील रक्कम 50 टक्क्यांनी 75 टक्क्यांनी कमी झाली तर बँक तुमच्याकडून जीएसटीसह 12 रुपये आकारेल. ग्रामीण भागात हा दंड अनुक्रमे ५ आणि ७.५ रुपये आहे.
एचडीएफसी बँक
तुमचे खाते एचडीएफसी बँकेत असल्यास आणि तुमच्या खात्यातील रक्कम शून्य किंवा एक हजार रुपयांपर्यंत असल्यास मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांकडून 450 रुपये आकारले जातात. जर रक्कम 1000 ते 2500 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून 270 रुपये आकारते. निमशहरी भागांबद्दल बोलायचे झाले तर, खात्यातील रक्कम शून्य ते २५०० च्या दरम्यान असल्यास खातेदारांकडून 300 रुपये आकारले जातात.
बँक ऑफ बडोदा
देना आणि विजया बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलीन करण्यात आली आहे. आता बँकेने आपल्या ग्राहकांना मेट्रो शहरांसाठी 2,000 रुपये आणि लहान शहरांसाठी 1,000 रुपये प्रत्येक तिमाहीत त्यांच्या अॅडव्हान्टेज सेव्हिंग खात्यात ठेवणे बंधनकारक केले आहे. बँक ऑफ बडोदाचा ग्राहक किमान शिल्लक राखू शकला नाही तर त्याला दंड भरावा लागेल. मेट्रो आणि इतर शहरी भागातील खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास 200 रुपये दंड आकारला जातो. तर शहरी नसलेल्या भागांसाठी दंडाची रक्कम १०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.